सारा अली खानने सांगितले स्टारकिड असल्याचे फायदे!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2019 06:00 AM2019-03-07T06:00:00+5:302019-03-07T06:00:01+5:30
तूर्तास सारा अली खान यशाची चव चाखतेय. सोबतचं स्टारकिड असल्यामुळेच हे शक्य झाल्याची प्रामाणिक कबुलीही देतेय.
ठळक मुद्देसाराचा हा प्रामाणिकपणा पाहून कुणाला आनंद होवो ना होवो, पण कंगनाला मात्र नक्कीच आनंद होईल. शेवटी बॉलिवूडमध्ये एक तर अशी स्टारकिड आहे, जिने नेपोटिज्म मान्य केलेय.
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान दोनचं चित्रपटांनी स्टार झालीय. ‘केदारनाथ’ या चित्रपटातून साराने डेब्यू केला आणि पाठोपाठ तिचा दुसरा सिनेमा ‘सिम्बा’ रिलीज झाला. या दुसºया चित्रपटाने बॉक्सआॅफिसवर अशी काही धूम केली की, सगळेच अवाक् झालेत. तूर्तास सारा अली खान यशाची चव चाखतेय. सोबतचं स्टारकिड असल्यामुळेच हे शक्य झाल्याची प्रामाणिक कबुलीही देतेय.
बॉलिवूडमध्ये दीर्घकाळापासून नेपोटिज्म अर्थात घराणेशाहीचा मुद्दा चर्चेत आहे. कंगना राणौतने या मुद्यावर करण जोहरला घेरले आणि या मुद्याला तोंड फुटले. अनेकांनी या मुद्यावर ब-यावाईट प्रतिक्रिया दिल्या. पण स्टारकिड्सचे म्हणाल तर अनेकांनी या मुद्यावर बोलणे टाळले. पण सारा मात्र यावर बेधडक बोलली. केवळ बोललीचं नाही तर स्टारकिड असल्याचे फायदेचं तिने ऐकवले. बॉलिवूडमध्ये स्टारकिड असल्याचे अनेक फायदे आहेत, हे तिने अगदी प्रामाणिकपणे कबुल केले. स्टारकिड असल्यामुळे तुम्ही थेटपणे बड्या बड्या लोकांशी संपर्क ठेवू शकतो. स्टारकिड नसाल तर यासाठी अनेकांच्या पाय-या झिजवाव्या लागतात. मी स्टारकिड आहे, म्हणूनच मी कधीही, केव्हाही करण जोहरला फोन करू शकते. रोहित शेट्टीच्या आॅफिसात जाऊ शकते. शिवाय सोबत बॉडीगार्ड असतात, त्यामुळे मी सुरक्षितही राहू शकते. हे सगळे फायदे मी नाकारू शकत नाही, असे सारा म्हणाली.
साराचा हा प्रामाणिकपणा पाहून कुणाला आनंद होवो ना होवो, पण कंगनाला मात्र नक्कीच आनंद होईल. शेवटी बॉलिवूडमध्ये एक तर अशी स्टारकिड आहे, जिने नेपोटिज्म मान्य केलेय.