उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरात पोहोचली सारा अली खान, गाभाऱ्यात जाऊन घेतलं दर्शन; Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2023 10:49 AM2023-05-31T10:49:02+5:302023-05-31T10:50:51+5:30

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान शिवभक्त आहे हे अनेकदा दिसून आलं आहे.

sara ali khan visited ujjain mahakal temple took blessings for her upcoming film jara hatke jara bachke | उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरात पोहोचली सारा अली खान, गाभाऱ्यात जाऊन घेतलं दर्शन; Video व्हायरल

उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरात पोहोचली सारा अली खान, गाभाऱ्यात जाऊन घेतलं दर्शन; Video व्हायरल

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) शिवभक्त आहे हे अनेकदा दिसून आलं आहे. सारा अनेकदा ज्योतिर्लिंगाचे दर्शन करायला जात असते. 'केदारनाथ' सिनेमातून डेब्यू करणारी सारा अली खान तिच्या सिनेमांच्या रिलीजपूर्वी धार्मिक यात्रा आवर्जुन करते. आज सकाळीच सारा उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरात दर्शनासाठी पोहोचली. मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन तिने दर्शन घेतले तसंच आरतीही केली. तिचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

सारा आगामी 'जरा हटके जरा बचके' सिनेमात विकी कौशलसोबत (Vicky Kaushal) दिसणार आहे. या सिनेमाच्या प्रमोशनसाठी ती अनेक ठिकाणांना भेट देत आहे. लक्ष्मण उतेकर यांचा हा सिनेमा २ जून रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. दरम्यान सारा आज उज्जैनला पोहोचली असून महाकालच्या मंदिरातील तिचा व्हिडिओ खूप पसंत केला जातोय. तिने डोक्यावर गुलाबी रंगाची ओढणी घेतली आहे. हात जोडून ती प्रार्थनाही करताना दिसते. आजुबाजूचेही कौतुकाने साराकडे पाहताना दिसतात. सारा नंतर गाभाऱ्यात जाते आणि पुजारी सांगतात त्याप्रमाणे आरती आणि अभिषेक करताना दिसत आहे.

 

यापूर्वी सारा आणि विकी लखनऊमध्ये होते. तिथे त्यांनी हनुमान सेतु मंदिरचे दर्शन घेतले. साराच्या या भूमिकेचं अनेकदा कौतुक झालं आहे. तिची शिवभक्ती बघून नेटकऱ्यांनाही कायमच आश्चर्य वाटलं आहे. सारा अली खान आगामी 'ऐ मेरे वतन','मेट्रो इन दिनो' या सिनेमांमध्ये झळकणार आहे.

Web Title: sara ali khan visited ujjain mahakal temple took blessings for her upcoming film jara hatke jara bachke

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.