'नावापुढचं अली आडनाव काढून टाक'; घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी गेलेल्या साराला नेटकऱ्यांचा सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2024 08:50 AM2024-01-24T08:50:29+5:302024-01-24T08:52:01+5:30
Sara ali khan: साराने नुकतंच घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतलं. येथील फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
एकीकडे बॉलिवूडसेलिब्रिटी प्रभू श्रीरामाचं दर्शन घेण्यासाठी आयोध्येला जात आहेत. तर दुसरीकडे सारा अली खान हिला श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं आमंत्रण मिळालं नव्हतं. त्यामुळे ती भगवान शंकराचं दर्शन घेण्यासाठी घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग येथे पोहोचली. येथील फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. हे फोटो पाहिल्यावर नेटकऱ्यांनी तिला आडनाव काढून टाकायचा सल्ला दिला आहे.
सारा महादेवाची मोठी भक्त असून ती कायम भगवान शंकराचं दर्शन घेण्यासाठी दूरदूरपर्यंत प्रवास करत असते. यावेळी तिने महाराष्ट्रातील वेरुळ येथील घृष्णेश्वर मंदिरात जाऊन महादेवाचं दर्शन घेतलं. येथील काही फोटो शेअर करत तिने जय भोलेनाथ असं कॅप्शनही दिलं. नुकतीच सैफ अली खानची ट्रायसेप्स सर्जरी झाली. त्यामुळे वडिलांना बरं वाटावं यासाठी ती महादेवाच्या मंदिरात गेल्याचं सांगण्यात येत आहे.
२२ तारखेला आयोध्येमध्ये राम मंदिरात प्रभू रामचंद्राच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमाचं देशातील अनेक दिग्गजांना आमंत्रण पाठवण्यात आलं होतं. मात्र,सलमान खान, शाहरुख खान, आमिर खान आणि सैफ अली खान यांसारख्या कलाकारांना आमंत्रण मिळालं नव्हतं. यात सारा अली खानचा सुद्धा समावेश होता. परंतु, ती महादेवाच्या मंदिरा जाऊन दर्शन घेऊन आली.
लोकांनी दिला आडनाव बदलायचा सल्ला
साराने हे फोटो शेअर केल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर कमेंटचा पाऊस पाडला आहे. एकच तर हृदय आहे साराजी, किती वेळा आमचं मन जिंकणार? असं एक युजर म्हणाला. तर, सारा अली नाही तर सनातनी आहे, असं अन्य दुसरा युजर म्हणाला. इतकंच नाही तर, एक काम कर तू तुझ्या नावापुढचं आडनाव काढून टाक, असा सल्लाही एका युजरने दिला आहे.
दरम्यान, लवकरच सारा अनुराग बसू यांच्या 'मेट्रो.. इन दिनों' या सिनेमात झळकणार आहे. या सिनेमात तिच्यासोबत आदित्य रॉय कपूर, पंकज त्रिपाठी हे स्क्रीन शेअर करणार आहेत.