'कुली नंबर १'मध्ये वरूण धवनसोबत झळकणार सारा अली खान?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2019 20:00 IST2019-03-09T20:00:00+5:302019-03-09T20:00:00+5:30
अभिनेता गोविंदाचा सुपरहिट चित्रपट 'कुली नंबर १'चा रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याबाबत खुद्द अभिनेता वरूण धवनने सांगितले.

'कुली नंबर १'मध्ये वरूण धवनसोबत झळकणार सारा अली खान?
अभिनेता गोविंदाचा सुपरहिट चित्रपट 'कुली नंबर १'चा रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याबाबत खुद्द अभिनेता वरूण धवनने सांगितले. अभिषेक वर्मनच्या 'कलंक' चित्रपटात मुख्य भूमिका साकारत असलेला वरुण धवनने एका मुलाखतीत सांगितले की, 'सलमान खानच्या जुडवाच्या रिमेकनंतर आता तो गोविंदाच्या 'कुली नंबर १'च्या रिमेकमध्ये काम करणार आहे.'
'कुली नंबर १'मध्ये गोविंदासोबत करिश्मा कपूरने मुख्य नायिकेची भूमिका साकारली होती. ही भूमिका प्रेक्षकांना खूपच आवडली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन वरुण धवनचे वडिल डेविड धवन यांनी केले होते. या चित्रपटाच्या रिमेकबाबत वरुणला विचारले असता त्याने अस्पष्टपणे उत्तरे दिली. तसेच त्याला मुख्य नायिकेबाबत आलिया भट्ट आणि सारा अली खान यांचे पर्याय दिले असता त्याने सध्या आलियासोबत कोणत्याही चित्रपटात काम करणार नाही कारण तिच्यासोबत बऱ्याच चित्रपटात काम केले आहे. मात्र त्याने साराच्या नावावर चुप्पी साधली.
दरम्यान, वरुण धवन आणि आलिया यांचा आगामी 'कलंक' चित्रपटाचे चित्रीकरण सुरू आहे. या चित्रपटात सोनाक्षी सिन्हा, आदित्य रॉय कपूर, माधुरी दीक्षित, संजय दत्त हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.
'कलंक' चित्रपटाच्या कथेची कल्पना करण जोहर आणि त्याचे वडील यश जोहरला पंधरा वर्षांपूर्वी सुचली होती. मात्र या चित्रपटाला कित्येक वर्ष मुहूर्त सापडत नव्हता. या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला असून चित्रपटाच्या टीझरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाचा काळ ४० च्या दशकातील असून सगळ्याच व्यक्तिरेखा एका वेगळ्या रंगभूषेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.