कार्तिक आर्यनला एक्स गर्लफ्रेंडने दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, सारा अली खानची खास पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2023 18:36 IST2023-11-22T18:35:51+5:302023-11-22T18:36:40+5:30
सारा अली खानने आपल्या सोशल मीडियावर अकाऊंटवर एक स्टोरी शेअर केली.

कार्तिक आर्यनला एक्स गर्लफ्रेंडने दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, सारा अली खानची खास पोस्ट
बॉलिवूडचा शहजादा कार्तिक आर्यन (Kartik Aryan) आज ३३ वा वाढदिवस साजरा करत आहे. संपूर्ण बॉलिवूड इंडस्ट्रीतून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. सध्या कार्तिकचं करिअरही जोरात आहे. मधल्या काळात कार्तिक आणि सारा अली खानच्या (Sara Ali Khan) अफेअरची चर्चा होती. मात्र हे नातं फार काळ चाललं नाही. तरी दोघंही मित्र बनून राहिले. साराने आज दोघांचा एक फोटो शेअर करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.
सारा अली खानने आपल्या सोशल मीडियावर अकाऊंटवर एक स्टोरी शेअर केली. यामध्ये तिने कार्तिकसोबतचा एक जुना फोटो पोस्ट केला आहे. यात दोघंही एकमेकांजवळ बसून हसत आहेत आणि खूप खूश दिसत आहेत. तसंच त्यांनी मोबाईल कव्हरमागील नोट दाखवतही एक फोटो शेअर केला आहे. तसंच हॅपी बर्थडे कार्तिक असं कॅप्शन दिलं आहे.
सारा आणि कार्तिक आर्यनने 'लव्ह आजकल 2' सिनेमात स्क्रीन शेअर केली होती. तेव्हापासूनच त्यांच्या अफेअरची चर्चा होती. नुकतंच कॉफी विथ करणच्या शोमध्ये साराने कार्तिकसोबतच्या नात्यावर भाष्य केलं होतं. यानंतर कार्तिक मात्र नाराज झाला होता. नात्याचा, त्या व्यक्तीचा आदर करणं गरजेचं आहे असं तो म्हणाला होता.