सारा अली खानकडे नाही काम, वेळ घालवण्यासाठी करते या गोष्टी !
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2021 04:25 PM2021-03-27T16:25:21+5:302021-03-27T16:26:07+5:30
Sara Ali Khan's new leisure hobby Is Reading: साराने 'केदारनाथ' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या सिनेमानंतर तिच्याकडे सिनेमांच्या अनेक ऑफर्स होत्या.अल्पावधीतच तिने सा-यांची वाहवा मिळवत इंडस्ट्रीत आपले स्थान निर्माण केले.
एरव्ही सतत कामात बिझी असणारी सारा अली खान आता घरीच निवांत वेळ घालवताना दिसतेय. दिलेल्या सगळ्या कमिटमेंटस तिने पूर्ण केल्या आहेत. त्यामुळे आता तिच्याकडे दुसरे काम नाही. त्यामुळेच सोशल मीडियावर तिने एक फोटो शेअर केला. फोटो शेअर करत म्हटले आहे की, सध्या दुसरे कोणतेही काम नाही.
त्यामुळे आवडते पुस्तकं वाचत वेळचा सदुपयोग करत असल्याचे तिने म्हटले आहे. त्यामुळे साराला अभिनयाव्यतिरिक्त पुस्तक वाचनाचीही आवड असल्याचे या फोटोवरुन स्पष्ट होते.नुकतेच तिने ब्रायडल फोटोही केले होते. नववधूप्रमाणे नटलेल्या साराचा हा अंदाज खूप आकर्षक होता.
साराने 'केदारनाथ' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या सिनेमानंतर तिच्याकडे सिनेमांच्या अनेक ऑफर्स होत्या.अल्पावधीतच तिने सा-यांची वाहवा मिळवत इंडस्ट्रीत आपले स्थान निर्माण केले. सोशल मीडियावर ती प्रचंड लोकप्रिय आहे. ३१ मिलियनपेक्षाही अधिक तिच्या फॉलोअर्सची संख्या आहे. साराला भटकंतीचीही फार आवड आहे. अधून- मधून भाऊ इब्राहिम आणि आई अमृता सिंगसह ती व्हॅकेशनवरही जात असते.
'द इम्मॉर्टल अश्वत्थामा'मध्ये विकी कौशलसोबत दिसणार सारा अली खान, सिनेमासाठी घेतेय अशी मेहनत
आगामी काळात सारा अली खान यात जबदरस्त अॅक्शन करताना दिसणार आहे. विकीच्या अपोझिट या सिनेमात तिची वर्णी लागली आहे. अजून याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही. यात सारा भरपूर अॅक्शन करताना पाहायला मिळणार आहे. सारा या चित्रपटातील तिच्या भूमिकेसाठी ट्रेनिंग घेते आहे. सारा अली खान दररोज जिममध्ये जाते आणि तिच्या फिटनेसची खास काळजी घेत आहे.
यासह, सारा 'द इम्मॉर्टल अश्वत्थामा'साठी अॅक्शन मास्टरकडून खास क्लास घेत आहे जेणेकरुन ती विकी कौशलसोबत 'द इम्मॉर्टल अश्वत्थामा'मध्ये अॅक्शन करू शकेल.विकी कौशल अश्वत्थामाच्या भूमिकेसाठी 100 किलोपेक्षा जास्त वजन वाढणार आहे. तो इज्राइल मार्शल आर्ट आणि जपानी मार्शल आर्ट्स शिकणार आहे. तसेच सिनेमात रॉयल लूक येण्यासाठी तो तलवारबाजी आणि तिरंदाजीचे प्रशिक्षणसुद्धा घेणार आहे.