सारा अली खानचा वर्कआऊट व्हिडीओ, जीममध्ये घाम गाळताना दिसली
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2023 12:12 PM2023-10-06T12:12:45+5:302023-10-06T12:21:09+5:30
नुकतेच सारा अली खानने तिचा एक वर्कआऊट व्हिडीओ शेअर केला आहे.
सारा अली खान ही फिटनेस फ्रिक अभिनेत्रींपैकी एक आहे. सारा सोशल मिडियावरही नेहमी ॲक्टीव्ह असते आणि बऱ्याचदा तिच्या चाहत्यांना ती फिटनेस विषयी काही टिप्स देत असते. नुकतेच सारा अली खानने तिचा एक वर्कआऊट व्हिडीओ शेअर केला आहे.
सारा अली खान सध्या पॅरिसमध्ये सुट्टी घालवत आहे. पॅरिसमधील जीममध्ये घाम गाळतानाचा व्हिडीओ तिने शेअर केला. साराने कॅप्शनमध्ये लिहिले, जॅमऐवजी जिम. पॅरिसमधील सर्वोत्तम जिममधील ही सर्वोत्तम सकाळ. व्हिडिओमध्ये सारा स्पोर्ट्स टॉप आणि ब्लू शॉर्ट्स तर पांढऱ्या रंगाच्या शूजमध्ये व्यायाम करताना दिसत आहे. इन्स्टाग्रामवर साराने शेअर केलेला हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला. हा व्हिडीओ पाहून चाहते तिच कौतुक करत आहेत.
एकेकाळी तर साराचं वजन चक्क ९६ किलो झालं होतं. पण बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी तिने तिचं वजन नियंत्रणात आणलं. आणि आजही फिट राहण्यासाठी ती प्रचंड मेहनत घेत असते. तिची ही वेट लॉस जर्नी अनेकांसाठी प्रेरणादायी देखील ठरली आहे. सारा अली खानने केदारनाथ या चित्रपटातून सिनेसृष्टीत पाऊल टाकलं. सिंबा, कुली नंबर 1 अतरंगी रे या चित्रपटात तिने काम केलं आहे.
साराच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर ती शेवटची विकी कौशलसोबत 'जरा हटके जरा बचके'मध्ये दिसली होती. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता ती लवकरच आदित्य रॉय कपूरसोबत 'मेट्रो दीज डेज' या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. अनुराग बसू दिग्दर्शित हा चित्रपट पुढील वर्षी मार्च २०२४ मध्ये प्रदर्शित होणार आहे. याशिवाय सारा 'ए वतन मेरे वतन' आणि 'मर्डर मुबारक' या चित्रपटातूनही चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.