NCBसमोर सारा अली खानचा दावा, माझ्या समोर घेतले होते सुशांत सिंग राजपूतने ड्रग्स
By गीतांजली | Published: September 28, 2020 08:43 PM2020-09-28T20:43:07+5:302020-09-28T20:49:57+5:30
ड्रग्स प्रकरणात बॉलिवूड अभिनेत्रींच्या अडचणीत वाढ होताना दिसतेय.
ड्रग्स प्रकरणात बॉलिवूड अभिनेत्रींच्या अडचणीत वाढ होताना दिसतेय. अभिनेत्री दीपिका पादुकोण असो किंवा सारा अली खान सगळ्या ड्रग्स प्रकरणात फसताना दिसतायेत. दीपिका, सारा आणि श्रद्धा कपूरची चौकशी एनसीबीने केली आहे. तिनही अभिनेत्रींचे फोन एनसीबीने जप्त केले आहेत. चौकशी दरम्यान सारा अली खान म्हणाली तिने कधीच ड्रग्स घेतले नाहीत. अभिनेत्री श्रद्धा कपूरने देखील ड्रग्स न घेतल्याचे सांगितले आहे.
आजतकच्या रिपोर्टनुसार साराने एनसीबीसमोप सांगितले की, केदारनाथ सिनेमाच्या शूटिंग दरम्यान आणि त्यानंतर सुशांतने तिच्यासमोर ड्रग्स घेतले होते. श्रद्धाने ही स्वत: कधीच ड्रग्सचे सेवन केले नसल्याचे सांगितले पण सुशांत ड्रग्स घ्यायचा असे तेही म्हणाली. रिया चक्रवर्तीच्या जबाबानुसार एनसीबीने सारा आणि श्रद्धाची चौकशी केली. मात्र या दोघींचे ड्रग्सबाबत कोणतचे चॅट नाही आहेत.
...म्हणून झालं होतं दोघांचं ब्रेकअप?
वेबसाइटला मिळालेल्या माहितीनुसार, साराने एनसीबीला सुशांतसोबतच्या ब्रेकअपचं कारण सांगितलं. साराने सांगितले की, सुशांत त्यांच्या रिलेशनशिपमध्ये लॉयल नव्हता. इतकेच नाही तर वेबसाइटने सूत्रांच्या हवाल्याने हेही सांगितले की, सारा म्हणाली की, सुशांत त्यांच्या रिलेशनशिपबाबत फार पझेसिव्ह राहत होता आणि तसेच त्याची अशी इच्छा राहत होती की, साराने तिच्या फिल्ममेकर्सना त्यालाच तिच्या पुढील सिनेमात घेण्यासाठी तयार करावं.
ड्रग्स प्रकरणात आपल्या मुलीला सैफला मदत करायची इच्छा नाही?
नवभारत टाईम्सच्या रिपोर्टनुसार, सारा अली खान सध्या चारही बाजूने या प्रकरणात अडकली आहे मात्र यातून बाहेर पडण्यासाठी ती सैफवर अजिबात अवलंबून राहिलेली नाही. रिपोर्टनुसार सैफ आली खान या प्रकरणात सारा अली खानची कोणतीच मदत करत नाहीय.
सैफने अमृता सिंगलाही फटकारले
रिपोर्टनुसार सैफने पूर्वपत्नी अमृता सिंगला सुद्धा चांगलेच फटकारले आहे, जी मुलीच्या करिअ संबंधित जवळजवळ सर्व निर्णय घेते. सैफ अली खान पत्नी करिना कपूरसोबत दिल्लीत रवाना झाला आहे.
व्हॅकेशनसाठी गोव्यालाच का जाते सारा अली खान? NCB चौकशीच्या एक दिवसाआधीचे फोटो आले समोर
बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणी NCB प्रमुख मुंबईत दाखल, घेतली तपास अधिकाऱ्यांची बैठक