कधी काळी सायकलवरून टाकायचा पेपर; ‘कंचना’मध्ये साकारला होता 'ट्रान्सजेन्डर'

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2020 06:04 PM2020-11-06T18:04:32+5:302020-11-06T18:15:48+5:30

लक्ष्मी या सिनेमात अक्षय कुमार पहिल्यांदा 'ट्रान्सजेन्डर'च्या भूमिकेत दिसणार आहेत. अक्षयचा हा सिनेमा ‘कंचना’ या तामिळ सिनेमाचा हिंदी रिमेक आहे

Sarath Kumar played transgender role in original film kanchana before akshay kumar laxmi release | कधी काळी सायकलवरून टाकायचा पेपर; ‘कंचना’मध्ये साकारला होता 'ट्रान्सजेन्डर'

कधी काळी सायकलवरून टाकायचा पेपर; ‘कंचना’मध्ये साकारला होता 'ट्रान्सजेन्डर'

googlenewsNext
ठळक मुद्देशरद कुमार एक स्पोर्टपर्सनही आहे. फुटबॉल, क्रिकेट, हॉकीमध्ये त्याने शाळा व कॉलेजचे प्रतिनिधित्व केले आहे.

अक्षय कुमारचा ‘लक्ष्मी’ हा सिनेमा येत्या 9 नोव्हेंबरला डिज्नी हॉटस्टारवर रिलीज होतोय. लक्ष्मी  या सिनेमात अक्षय कुमार पहिल्यांदा ट्रान्सजेन्डर अर्थात तृतीयपंथीयाच्या भूमिकेत दिसणार आहेत. अक्षयचा हा सिनेमा ‘कंचना’ या तामिळ सिनेमाचा हिंदी रिमेक आहे, हे तुम्ही जाणताच. पण ‘कंचना’मध्ये 'ट्रान्सजेन्डर'ची भूमिका कोणी साकारली होती, हे तुम्हाला ठाऊक आहे? तर ही भूमिका साकारली होती सुप्रसिद्ध अभिनेता शरद कुमार याने.

होय, ‘कंचना’ या सिनेमात शरद कुमार 'ट्रान्सजेन्डर'च्या भूमिकेत होता. शरद कुमारचे खरे नाव रामानाथन शरद कुमार आहे. अभिनयासोबतच तो राजकारणातही सक्रिय आहे. शरद कुमारने 130 पेक्षा अधिक तामिळ, मल्याळम, तेलगू व कन्नड सिनेमात भूमिका साकारल्या आहेत. 1986 मध्ये  Samajamlo Sthree या सिनेमातून त्याच्या फिल्मी करिअरची सुरुवात झाली. पहिल्याच सिनेमात त्याच्या वाट्याला आला तो निगेटीव्ह रोल. मात्र यानंतर तो सपोर्टिंग रोल्समध्ये दिसू लागला.  

कधी काळी टाकायचा पेपर
शरद कुमार एक स्पोर्टपर्सनही आहे. फुटबॉल, क्रिकेट, हॉकीमध्ये त्याने शाळा व कॉलेजचे प्रतिनिधित्व केले आहे. शिक्षण पूर्ण केल्यानंतर शरदने ‘दीनाकरण’ या तामिळ वृत्तपत्रात नोकरी केली. दुकानांत सायकलवरून पेपर टाकायचे काम तो करायचा. पुढे तो याच वृत्तपत्राचा पत्रकार बनला. अर्थात काही काळ. कारण यानंतर शरदने स्वत:चा बिझनेस थाटला. चेन्नईत त्याने स्वत:ची ट्रव्हल एजन्सी सुरु केली. याचदरम्यान त्याच्या आयुष्याने कलाटणी घेतली आणि तो फिल्मी दुनियेत आला.

दोन लग्न
शरदच्या पर्सनल लाईफबद्दल सांगायचे तर त्याने दोन लग्न केलीत. पहिल्या पत्नीपासून त्याला दोन मुली आहे. पहिल्या पत्नीसोबत संसार सुरु असतानाच शरद व अभिनेत्री नगमा यांच्या अफेअरच्या चर्चा सुरु झाल्या. या चर्चांमुळे पहिल्या पत्नीने शरदला घटस्फोट दिला. पुढे नगमाही त्याच्या आयुष्यातून गेली. 2001 मध्ये शरदने अभिनेत्री राधिकासोबत दुसरे लग्न केले. दोघांना एक मुलगा आहे.

अक्षय कुमारच्या सिनेमाचा वाद थांबता थांबेना; ट्विटरवर पुन्हा ट्रेंड झाला #Ban_Laxmmi_Movie

अखेर बदलले अक्षय कुमारच्या ‘लक्ष्मी बॉम्ब’चे नाव, आता या टायटलने रिलीज होणार सिनेमा

- तर तलवारी निघाल्या असत्या...! अक्षय कुमारच्या ‘लक्ष्मी बॉम्ब’वर संतापले मुकेश खन्ना

Web Title: Sarath Kumar played transgender role in original film kanchana before akshay kumar laxmi release

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.