Saroj Khan Death: सरोज खान यांच्या जाण्याने दु:खात बुडाले बॉलिवूड
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2020 12:04 PM2020-07-03T12:04:58+5:302020-07-03T12:10:39+5:30
प्रसिद्ध कोरियोग्राफर सरोज खान यांचे रात्री सुमारे २ वाजता कार्डियक अरेस्टने निधन झाले. बॉलिवूड स्टार्ससोबत सरोज खान यांचे खूपच जवळचे नाते होते. त्यांच्या निधनाने अख्खे बॉलिवूड दु:खात बुडाले असून काही स्टार्सनी सोशल मीडियावर त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
-रवींद्र मोरे
२०२० हे वर्ष बॉलिवूडसाठी खूपच दु:खद ठरत आहे. गेल्या दोन महिन्यात बऱ्याच दिग्गज स्टार्सनी जगाचा निरोप घेतला. शुक्रवारदेखील असाच बॉलिवूडसाठी एक वाईट दिवस ठरला. प्रसिद्ध कोरियोग्राफर सरोज खान यांचे रात्री सुमारे २ वाजता कार्डियक अरेस्टने निधन झाले. बॉलिवूड स्टार्ससोबत सरोज खान यांचे खूपच जवळचे नाते होते. त्यांच्या निधनाने अख्खे बॉलिवूड दु:खात बुडाले असून काही स्टार्सनी सोशल मीडियावर त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
* माधुरी दीक्षित
I'm devastated by the loss of my friend and guru, Saroj Khan. Will always be grateful for her work in helping me reach my full potential in dance. The world has lost an amazingly talented person. I will miss you💔 My sincere condolences to the family. #RIPSarojji
— Madhuri Dixit Nene (@MadhuriDixit) July 3, 2020
सरोज खान आणि माधुरी दीक्षितने बॉलिवूडला कित्येक हिट गाणे दिले आहेत. सरोज खान यांच्या निधनाने माधुरीला खूपच दु:ख झाले असून तिने ट्वीट करुन लिहिले आहे की, ‘मी माझी मैत्रिण आणि गुरु, सरोज खान यांच्या निधनाने खूपच शॉकमध्ये आहे. डान्समध्ये पुर्ण क्षमतेपर्यंत पोहचविण्यास मदत करण्यासाठी नेहमी आपल्या ऋणात राहिल. जगाने एक अद्भूत प्रतिभाशाली व्यक्तिला गमविले आहे. मी आपणास सदैव स्मरणात ठेवेन. माझ्या मनात कुटुंबासाठी माझी आत्मिक संवेदना आहे.’
* अमिताभ बच्चन
T 3582 - Prayers .. 🙏 ..
— Amitabh Bachchan (@SrBachchan) July 3, 2020
हाथ जुड़े हैं , मन अशांत
सरोज खान यांच्या निधनाने बिग बी अमिताभ बच्चन देखील खूपच दु:खी झाले. अमिताभ यांनी नाव तर नाही लिहिले, मात्र त्यांच्या लिहण्याच्या अंदाजाने असे वाटते की, तेही खूप शॉकमध्ये आहेत. त्यांनी ट्वीट करत लिहिले आहे की, ‘प्रार्थना, हात जुडले आहेत, मन अशांत..!’
* अक्षय कुमार
Woke up to the sad news that legendary choreographer #SarojKhan ji is no more. She made dance look easy almost like anybody can dance, a huge loss for the industry. May her soul rest in peace 🙏🏻
— Akshay Kumar (@akshaykumar) July 3, 2020
अक्षयलाही दु:ख झाले असून ट्वीटमध्ये लिहिले आहे की, ‘सकाळी एक दु:खद बातमी मिळाली की, दिग्गज कोरियोेग्र्राफर सरोज खान आपल्यात नाही राहिल्या. त्यांनी डान्सला एवढे सोपे करुन टाकले होते की, सहज कोणीही डान्स करु शकत होता. इंडस्ट्रीसाठी खरंच खूप मोठे नुकसान आहे. त्यांच्या आत्म्यास शांती मिळो.’
* रेमो डिसूजा
#RIP SAROJI YOU WILL BE MISSED .... big loss to dance fraternity ..... pic.twitter.com/1Kv5B6CpKv
— Remo D'souza (@remodsouza) July 3, 2020
रेमोलाही त्यांच्या जाण्याने दु:ख झाले आहे. कोरियोग्राफर रेमो डिसूजाने ट्वीट केले आहे की, ‘सरोजजी आपणास सदैव आठवण करत राहिन. डान्स जगताला खूपच मोठे नुकसान झाले आहे.
* अनुपम खेर
डान्स की मल्लिका #सरोजखान जी अलविदा।आपने कलाकारों को ही नहीं बल्कि पूरे हिन्दुस्तान को बहुत ख़ूबसूरती से सिखाया कि “इन्सान शरीर से नहीं, दिल और आत्मा से नाचता है”।आपके जाने से नृत्य की एक लय डगमगा जाएगी। मैं पर्सनली ना सिर्फ़ आपको बल्कि आपकी मीठी डांट को भी बहुत मिस करूँगा।🙏😥
— Anupam Kher (@AnupamPKher) July 3, 2020
अनुपम खेर यांनीदेखील सरोज खान यांना स्मरण करत लिहिले आहे की, ‘डान्सची मल्लिका सरोज खानजी ईश्वर आपल्या आत्म्यास शांती देओ. आपण कलाकारांनाच नव्हे तर संपूर्ण भारताला खूपच सुंदर पद्धतीने शिकवले की, ‘मनुष्य शरीराने नव्हे तर, मन आणि आत्म्याने नाचत असतो. आपल्या जाण्याने नृत्याची एक लळ डगमगेल. मी व्यक्तिगत केवळ आपणासच नव्हे तर आपल्या प्रेमाने रागावण्यालाही खूप मिस करेल.’