बिग डिल!! कोट्यवधीत विकले गेले शाहरूख खानच्या चित्रपटांचे हक्क!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2019 15:15 IST2019-04-11T15:14:51+5:302019-04-11T15:15:52+5:30
किंगखान शाहरुख खानच्या फिल्मी करिअरला सध्या ओहोटी लागलीय. पण म्हणून किंगखानची डिमांड जराही कमी झालेली नाही. विश्वास बसत नसेल तर ही ताजी बातमी वाचाच.

बिग डिल!! कोट्यवधीत विकले गेले शाहरूख खानच्या चित्रपटांचे हक्क!
किंगखान शाहरुख खानच्या फिल्मी करिअरला सध्या ओहोटी लागलीय. पण म्हणून किंगखानची डिमांड जराही कमी झालेली नाही. विश्वास बसत नसेल तर ही ताजी बातमी वाचाच. ऐकून आश्चर्य वाटेल, पण शाहरूखच्या चित्रपटांचे राईट्स अर्थात चित्रपटांचे हक्क कोट्यवधी रूपयांना विकले गेले आहेत. ही आत्तापर्यंतची सर्वांत मोठी सॅटेलाईट डिल असल्याचे म्हटले जात आहे.
डेक्कन क्रोनिकलने दिलेल्या वृत्तानुसार, चाहत्यांमध्ये अद्यापही शाहरूखच्या चित्रपटांबद्दलचे क्रेज कायम आहे. टीव्हीवर त्याचे चित्रपट जबरदस्त टीआरपी मिळवतात. हेच कारण आहे की, शाहरूखच्या २२ सुपरहिट चित्रपटांचे सॅटेलाइट हक्क कोट्यवधी किंमतीला विकले आहेत.
या २२ चित्रपटांमध्ये चमत्कार, पहेली, स्वदेश, ओम शांती ओम, दिलवाले, फिर भी दिल है हिंदुस्तानी, चेन्नई एक्स्प्रेस, हॅपी न्यू ईअर, राम जाने अशा अनेक चित्रपटांचा समावेश आहे. हे चित्रपट खासगी वाहिनीवर पाहायला मिळतील. ही डिल किती कोटींत झाली, हे कळू शकलेले नाही. पण यातील बराच मोठा नफा शाहरूखला मिळणार आहे.
गेल्या काही वर्षांत शाहरूखचे एकापाठोपाठ एक असे अनेक चित्रपट आपटले. गतवर्षी आलेल्या ‘झिरो’ या चित्रपटाकडून त्याला बऱ्याच अपेक्षा होत्या. पण हा चित्रपटही दणकून आपटला. तूर्तास शाहरूखने एकही चित्रपट साईन केलेला नाही. सध्या शाहरूख आयपीएलमध्ये बिझी आहे. केकेआर टीमचा मालक या नात्याने प्रत्येक सामन्यात तो टीमला चीअर करताना दिसतोय.
मध्यंतरी अंतराळवीर राकेश शर्मा यांच्या बायोपिकमध्ये शाहरूख दिसणार अशी चर्चा होती. मात्र अचानक या चित्रपटात शाहरूखच्या जागी विकी कौशलची वर्णी लागणार असल्याची बातमी आली. अद्याप शाहरूखने याबद्दल कुठलाही खुलासा केलेला नाही.