'पैसे कमवण्याचा चुकीचा मार्ग..'; सतीश कौशिक यांनी एअरलाइन्सवर केले गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2022 12:32 PM2022-05-28T12:32:55+5:302022-05-28T13:03:07+5:30
प्रसिद्ध बॉलिवूड चित्रपट निर्माते आणि अभिनेते सतीश कौशिक यांनी गो फर्स्ट एअरलाइनवर गंभीर आरोप केलेत. सतीश यांनी फ्लाइटमधील एका सीटबद्दल ...
प्रसिद्ध बॉलिवूड चित्रपट निर्माते आणि अभिनेते सतीश कौशिक यांनी गो फर्स्ट एअरलाइनवर गंभीर आरोप केलेत. सतीश यांनी फ्लाइटमधील एका सीटबद्दल आपल्यासोबत कशी गौरवर्तणुक झाली हे सांगितले. एकामागून एक पोस्ट करत त्यांनी संपूर्ण घटना तपशीलवार सांगितली आहे.
सतीश कौशिक यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर एअरलाइन्स फ्लाइट जर्नीशी संबंधित एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले की, 'गो फर्स्ट एअरवेज हे खूप दुःखद आहे, त्यांनी प्रवाशांकडून पैसे कमवण्यासाठी चुकीचा मार्ग शोधला आहे. माझ्या ऑफिसमधील (सतीश कौशिक/अजय राय) पहिल्या रांगेतील मधल्या दोन सीट 25,000 रुपयांना बुक केल्या होत्या पण माझ्या ऑफिसने पैसे भरले असताना या लोकांनी त्या सीट्स दुसऱ्या पॅसेंजरला विकली.
It is very very sad that @GoFirstairways has to use dubious ways to earn money from passengers. My office booked two seats (Satish Kaushik/Ajay Rai) in the first row with middle seat also and paid 25K in G8 2315 from Mum-Dehradun on 23rd June. But alas they sold the middle
— satish kaushik (@satishkaushik2) May 25, 2022
Is it right ?? Is this the way to earn extra money by harassing a passenger. It is not about getting refund but it is about voicing your grievance.
— satish kaushik (@satishkaushik2) May 25, 2022
सतीश कौशिक यांचे पुढील ट्विटमध्ये त्यांनी लिहिले, 'हे ठीक आहे का? प्रवाशाला त्रास देऊन अधिक पैसे कमवण्याचा हा मार्ग आहे का? पैसे परत मिळणे ही बाब नसून तुमचे ऐकण्याची बाब आहे. मी फ्लाइट थांबवू शकलो असतो पण मी तसे केले नाही कारण तिथं इतर लोकही होते जे आधीच ३ तास वाट पाहत आहेत. गुडलक गो फर्स्ट एयरवे.
I could have hold the flight but my goodness and holding the passengers for more hours after three hours of torturous delay did not allow me to do that. Good luck #GoFirstairways
— satish kaushik (@satishkaushik2) May 25, 2022
एअरलाईन्स कंपनीचा पैसे परत करण्यास नकार दिला
सतीश कौशिक यांनी आपल्या पुढच्या ट्विटमध्ये लिहिले की, जेव्हा मदत मागितली गेली तेव्हा त्यांना सांगण्यात आले की पॅसेंजर पुढच्या फ्लाइटने जातील पण पॅसेंजर त्याच फ्लाइटमधील होते. सतीश कौशिक यांनी लिहिले की, 'जेव्हा त्या पॅसेंजरला जागा मिळाली नाही, तेव्हा फ्लाइट थांबवण्यात आली. त्यानंतर मी त्याला जागा देण्याचे ठरवले. चांगली गोष्ट म्हणजे फ्लाइट अटेंडंट आणि एअर होस्टेसने यासाठी माझे आभार मानले. त्या सीटचे माझे पैसे परत मिळतील असेही त्यांनी सांगितले पण मी त्यांना सांगितले की असे कधीच होणार नाही. आणि तसेच झाले एअरलाईन्सने रिफंड देण्यास नकार दिला.
`