सतीश कौशिक यांच्या मृत्यूमागे विकास मालूचा हात? पोस्ट शेअर करत म्हणाला, 'सतीशजी ३० वर्षांपासून...'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2023 09:37 AM2023-03-12T09:37:19+5:302023-03-12T09:38:18+5:30

विकास मालू हा त्या फार्महाऊसचा मालक आहे. तर त्याची स्वत:ची कुबेर ग्रुप ही कंपनी देखील आहे.

satish kaushik death farm house owner vikas malu shared post and denies his name behind this tragedy | सतीश कौशिक यांच्या मृत्यूमागे विकास मालूचा हात? पोस्ट शेअर करत म्हणाला, 'सतीशजी ३० वर्षांपासून...'

सतीश कौशिक यांच्या मृत्यूमागे विकास मालूचा हात? पोस्ट शेअर करत म्हणाला, 'सतीशजी ३० वर्षांपासून...'

googlenewsNext

अभिनेता आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांचं ९ मार्च रोजी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं. निधनाच्या आदल्याच दिवशी सतीश कौशिक यांनी मित्रपरिवारासोबत होळी साजरी केली. रंग खेळतानाचे त्यांचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले. या फोटोंमध्ये सतीश कौशिक अगदी तंदुरुस्त दिसत होते. अचानक दुसऱ्या दिवशी त्यांच्या निधनाच्या बातमी आल्याने कोणाचाच यावर विश्वास बसला नाही. मात्र सतीश कौशिक यांची हत्या झाल्याचा दावा एका महिलेने केला आहे. फार्म हाऊसच्या मालकानेच त्यांची हत्या केल्याचा आरोप त्या महिलेने केला आहे. विकास मालू असं मालकाचं नाव आहे तर त्याची पत्नी सान्वी मालू हिनेच पतीविरोधात हा दावा केला आहे. त्यामुळे सतीश कौशिक यांच्या मृत्यूला आता वेगळे वळण आले आहे.

सतीश कौशिक यांच्या निधनानंतर पोलिसांनी दिल्लीच्या फार्म हाऊसवर जात आवश्यक सर्व तपासणी केली. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्येही काही संशयास्पद आढळलं नाही. सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सध्या सुरु आहे. फार्म हाऊस काही औषधं आणि गोळ्या मिळाल्या आहेत. 

कोण आहे विकास मालू?

विकास मालू हा त्या फार्महाऊसचा मालक आहे. तर त्याची स्वत:ची कुबेर ग्रुप ही कंपनी देखील आहे. विकास मालूचे बॉलिवूड सेलिब्रिटींसोबतही खास संबंध आहेत. विकास मालूने इन्स्टाग्रामवर होळीचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.यामध्ये सतीश कौशिक दिलखुलासपणे नाचताना दिसत आहेत. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले, '३० वर्षांपासून सतीशजी मला कुटुंबासारखेच आहेत. पण यात माझं नाव चुकीच्या पद्धतीने घेण्यास लोकांना एक मिनिटही लागला नाही. इतक्या छान सेलिब्रेशननंतर जे काही घडलं ते बदलता येणार नाही. मी शांत न बसता हे सांगू इच्छितो की जे घडायचं ते घडतंच मृत्यू कोणाच्याच हातात नसतो. यापुढच्या सर्वच सेलिब्रेशनमध्ये सतीशजींची आठवण येईल.'


 तर सान्वी मालू त्याची पत्नी आहे. सान्वी मालूने पतीविरोधात तक्रार दाखल केली आहे. यात तिने दावा केला आहे ती सतीश कौशिक यांची हत्या काही संशयित गोळ्या देऊन केली गेली आहे. यामागे माझ्या पतीचाच हात आहे असं तिने म्हणलं आहे. 

माध्यम रिपोर्टनुसार, सतीश कौशिक आणि विकास मालू ३० वर्षांपासून एकमेकांचे मित्र आहेत. विकासने दिल्लीच्या फार्महाऊसमध्ये जेव्हा होळीची पार्टी आयोजित केली तेव्हा सतीश कौशिकही त्यात सहभागी झाले. सान्वी मालू हिने दिल्ली पोलिस आयुक्तांना पत्र लिहित खुलासा केला की,'सतीश कौशिक माझ्या पतीचे जुने मित्र होतेय मात्र १५ कोटी रुपयांसाठी दोघांमध्ये भांडण झालं. माझ्या पतीने कौशिक यांच्याकडून १५ कोटी घेतले होते जे अजून परत केले नव्हते.'

सान्वी मालू हिने दोन महिन्यांपूर्वीच पती विकास मालू विरोधात बलात्काराची केस दाखल केली होती. विकास मालू बॉलिवूड सेलिब्रिटींच्याही जवळचा आहे. त्याच्या सोशल मीडिया प्रोफाईलवरुन हे लक्षात येते.

Web Title: satish kaushik death farm house owner vikas malu shared post and denies his name behind this tragedy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.