​सतीश कौशिक करणार ‘तेरे नाम’चा सिक्वल!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2016 09:32 PM2016-11-25T21:32:32+5:302016-11-25T21:32:32+5:30

बॉलिवूडचा ‘दबंग खान’ सलमान याचा सुपरहिट चित्रपट ‘तेरे नाम’ या चित्रपटाचा सिक्वल तयार करण्यात येणार असल्याची चर्चा बॉलिवूडमध्ये सुरू ...

Satish Kaushik's 'Tere Naam' sequel! | ​सतीश कौशिक करणार ‘तेरे नाम’चा सिक्वल!

​सतीश कौशिक करणार ‘तेरे नाम’चा सिक्वल!

googlenewsNext
ong>बॉलिवूडचा ‘दबंग खान’ सलमान याचा सुपरहिट चित्रपट ‘तेरे नाम’ या चित्रपटाचा सिक्वल तयार करण्यात येणार असल्याची चर्चा बॉलिवूडमध्ये सुरू झाली आहे. ‘तेरे नाम’ या चित्रपटाचा सिक्वल तयार करण्याचा विचार दिग्दर्शक सतीश कौशिक करीत असल्याचे त्यांनी सांगितले.  

अभिनेता सलमान खान व अभिनेत्री भूमिका चावला यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘तेरे नाम’ हा चित्रपट २००३ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर प्रचंड कमाई केली होती. सलमान खानने साकारलेली ‘राधे’ ही भूमिका युवकांना चांगलीच भावली होती. या चित्रपटात त्याने केलेली केशरचना आजही अनेक युवकांत दिसून येते. दाक्षिणात्या चित्रपटातील अभिनेत्री भूमिका चावला हिने निर्जरा या साध्या मुलीची भूमिका केली होती. 

Satish Kaushik make siqule of Tere naam

‘तेरे नाम’च्या सिक्वलबद्दल माहिती देताना दिग्दर्शक सतीश कौशिक म्हणाले, माझ्या ट्विटर अकाऊंटवर ‘तेरे नाम’चा सिक्वल तयार करण्यात यावा अशी प्रचंड मागणी होत आहे. या चित्रपटाशी साम्य असणाºया अनेक लेखकांच्या सुमारे १५ कथा माझ्याजवळ आहेत. यातील काही कथांची मी निवड केली आहे. मात्र जुण्या चित्रपटावर अवलंबून राहायचे की नवा चित्रपट तयार करायचे हा विचार सध्या मी करीत आहे. 

Satish Kaushik Director Tere naam

सलमान खानच्या दंबगचा सिक्वल सुपरहीट ठरला होता आता त्याचा तिसरा भाग येणार असल्याची चर्चा आहे. या सोबतच सलमानचा जुडवा व पार्टनर या चित्रपटांचे देखील सिक्वल तयार करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. याच दरम्यान सलमाननेही निर्मिती क्षेत्रात पर्दापण केले आहे. बॉलिवूडमध्ये सध्या सिक्वलचे चलन आले आहे. दरम्यान ‘तेरे नाम’च्या सिक्वलमध्ये सलमानच भूमिका केरल का व त्याची अभिनेत्री कोन असेल यावरही तर्क  लावला जात आहे. 

Web Title: Satish Kaushik's 'Tere Naam' sequel!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.