'स्वातंत्र्य वीर सावरकर' चित्रपटाबद्दल वीर सावरकरांचे नातू रणजीत काय म्हणाले?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2024 12:13 PM2024-03-18T12:13:11+5:302024-03-18T12:25:30+5:30
'स्वातंत्र्य वीर सावरकर' सिनेमा 22 मार्च रोजी मराठी आणि हिंदी भाषेत प्रदर्शित होणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून 'स्वातंत्र्यवीर सावरकर' या सिनेमाची चर्चा सुरू आहे. अभिनेता रणदीप हुड्डा या चित्रपटात सावरकरांची भूमिका साकारत आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलरही प्रदर्शित करण्यात आला होता. ट्रेलरमधील दमदार स्टारकास्ट, उत्तम कथानक, संवाद, दिग्दर्शन पाहून प्रेक्षक आता या चित्रपटाची आतुरतेनं वाट पाहात आहेत. ट्रेलरनंतर सिनेमावर विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. यातच आता चित्रपटाबद्दल विनायक दामोदर सावरकर यांचे नातू रणजीत सावरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
रणजीत सावरकर यांनी रणदीप हुडाचं कौतुक केलं आहे. रणजीत सावरकर म्हणाले, 'रणदीप हुड्डासोबत माझी अनेकदा चर्चा झाली. मी अद्याप सिनेमा पाहिलेला नाही. पण मला माहिती आहे सिनेमासाठी रणदीपने प्रचंड मेहनत घेतली आहे. त्याने स्वतःला झोकून देऊन काम केलं आहे. भुमिकेसाठी त्याने 30 किलो वजन कमी केलं आहे.
पुढे ते म्हणाले, 'इतिहास नव्या पिढीसमोर मांडताना सिनेमा हे चांगलं माध्यम आहे. सिनेमाद्वारे आपण भारताचा इतिहास आपण नव्या पिढी पर्यंत पोहोचवू शकतो. स्वातंत्र्यसैनिकांवर आणखी सिनेमे बनतील अशी आशा आहे. ऐतिहासिक घटनांचे जतन करण्यासाठी चित्रपट महत्त्वाचे आहेत'.
'स्वातंत्र्य वीर सावरकर' सिनेमा 22 मार्च रोजी मराठी आणि हिंदी भाषेत प्रदर्शित होणार आहे. सिनेमात रणदीप हुड्डा याच्यासोबत अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि अभिनेता अमित सियाल यांनी महत्त्वाची भूमिका साकारली आहे. चाहते देखील सिनेमाच्या प्रतीक्षेत आहेत. सिनेमा पाहण्यासाठी चित्रपटगृहात प्रेक्षकांची मोठी गर्दी होणार असं म्हणायला हरकत नाही.