Tabu On Box Office Collection:  म्हणे, माझा काय संबंध...! बॉक्स ऑफिस कलेक्शनवर हे काय बोलून गेली तब्बू, सगळेच हैराण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2022 03:25 PM2022-08-18T15:25:09+5:302022-08-18T15:25:47+5:30

Tabu On Box Office Collection: होय, बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल तब्बू असं काही बोलून गेली की सगळेच हैराण झालेत.

Say, what is my relationship...! What is Tabu talking about at the box office collection, everyone is shocked | Tabu On Box Office Collection:  म्हणे, माझा काय संबंध...! बॉक्स ऑफिस कलेक्शनवर हे काय बोलून गेली तब्बू, सगळेच हैराण

Tabu On Box Office Collection:  म्हणे, माझा काय संबंध...! बॉक्स ऑफिस कलेक्शनवर हे काय बोलून गेली तब्बू, सगळेच हैराण

googlenewsNext

Tabu On Box Office Collection:  लॉकडाऊननंतर बॉलिवूडचं अख्खं गणित बदललं आहे. यावर्षात तर बॉलिवूडचं टेन्शन चांगलंच वाढलेलं दिसतंय. कोट्यवधी रूपये खर्चून बनवलेले सिनेमे एकापाठोपाठ एक दणादण आपटत आहेत. एकीकडे साऊथचे सिनेमे चांगली कमाई करत असताना बॉलिवूड सिनेमांकडे प्रेक्षक फिरकेनासे झाले आहेत. दुसरीकडे सोशल मीडियावर बायकॉट बॉलिवूडच्या मोहिमेने वेग घेतला आहे. साहजिकच बॉलिवूडचं टेन्शन वाढलं आहे. अगदी कलाकार मंंडळी सुद्धा बॉक्स ऑफिस कलेक्शनचं टेन्शन घ्यायला लागली आहेत. पण अभिनेत्री तब्बू (Tabu) ही मात्र एकदम टेन्शन फ्री आहे.  बॉक्स ऑफिस कलेक्शनची तिला जराही चिंता नाही. होय, बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल तब्बू असं काही बोलून गेली की सगळेच हैराण झालेत.

माझं काहीही देणंघेणं नाही...
हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत तब्बू चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर बोलली.  माझ्या चित्रपटाने किती कमाई केली याचेशी माझं काहीही देणंघेणं नाही. मी याबद्दल अजिबात चिंता करत नाही, असं ती म्हणाली. ‘चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनशी माझा काहीही संबंध नाही. कारण या चित्रपटांमध्ये माझा पैसा गुंतलेला नसतो. माझ्या मते, कलाकारांनी याचं फार टेन्शन घेण्याची गरज नाही. आपला पैसा लागलेला नाही म्हटल्यावर अ‍ॅक्टर्स लकी आहेत. फक्त चित्रपट चांगला हवा आणि चित्रपटातील आपलं काम चांगलं व्हायरला हवं. कलेक्शनची चिंता करणं हे अ‍ॅक्टर्सचं काम नसून निर्मात्यांचं आहे. चित्रपटाने चांगली कमाई केली की, आनंद मिळतो हे खरं असलं तरी मला स्वत:ला बॉक्स ऑफिस नंबर्स गेमपासून दूर राहणं आवडतं, असं ती म्हणाली.

एखादा सिनेमा फ्लॉप झाल्यानं करिअर संपत नाही...
एक चित्रपट हिट झाल्यास सर्वांना त्याचा फायदा होता. पण एखादा सिनेमा फ्लॉप झाला तर कलाकाराचं करिअर संपत नाही. आपल्याला आपलं मानधन मिळतं. आपलं काम व्यवस्थित असलं आणि चित्रपट चांगला असला की बाकी बोलण्याची गरज नाही, असंही ती म्हणाली.
 तब्बूच्या या वक्तव्यानं अनेकांना आश्चयार्चा धक्का बसला आहे.  अलीकडे  तब्बूचा ‘भूल भुलैया 2’ नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटाने बक्कळ कमाई केली.  या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 200 कोटींहून अधिकची कमाई केली. इतकंच नाही तर हा  सिनेमा तब्बूच्या करिअरमधील सर्वात हिट चित्रपट ठरला.

 

Web Title: Say, what is my relationship...! What is Tabu talking about at the box office collection, everyone is shocked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.