" श्वार्जनेगर अॅक्शन चित्रपटांना दिला एक नवा दर्जा"
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2017 11:12 AM2017-04-14T11:12:57+5:302017-04-14T16:42:57+5:30
जेव्हा जेव्हा अॅक्शन चित्रपटाबद्दल बोलले जाते तेव्हा दोन नावं समोर येतात एक हॉलिवूड मधील अरनॉल्ड श्वार्जनेगर आणि बॉलिवूडमधला स्टायलिश ...
ज व्हा जेव्हा अॅक्शन चित्रपटाबद्दल बोलले जाते तेव्हा दोन नावं समोर येतात एक हॉलिवूड मधील अरनॉल्ड श्वार्जनेगर आणि बॉलिवूडमधला स्टायलिश हंक विदुयत जामवाल दोघेही आपल्या वेगवेगळ्या स्टाईलमध्ये एक से बढकर एक आहेत, त्यांच्या कसरती आणि कामबद्दलची निष्ठा जवळ जवळ एकाच आहे आणि यामुळेच त्यांचा चाहतावर्ग संपूर्ण जगभरात आहे .त्यांचे आणखी एक साम्य म्हणजे दोघांनी कमांडो नावाच्या चित्रपटात काम केले आहे. श्वार्जनेगरने १९८५ मध्ये आलेल्या ‘कमांडो’ या चित्रपटात काम केले होते तर विद्युतसुद्धा कमांडो या बॉलिवूड अॅक्शन चित्रपटात दिसला होता.
अरनॉल्ड चा नवीन चित्रपट 'आफ्टरमैथ’ भारतात नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन इलियट लेस्टरने केले आहे. या चित्रपटात अरनॉल्ड एका वृद्ध व्यक्तीच्या भूमिकेत दिसतोय जो आपल्या कुटुंबातील लोकांच्या झालेल्या हत्येचा बदला घेण्यासाठी धडपडत आहे. यात अरनॉल्ड आहे तर भरपूर अॅक्शन असणार ह्यात वादच नाही. ह्याच बरोबर विदयुत ही असाच एका चित्रपटाद्वारे आपल्या समोर येणार आहे. तिग्मांशु धूलिया दिग्दर्शित यारा असे या चित्रपटाचे नाव आहे, हा चित्रपट ही असाच एका घेतलेल्या बदल्याची कहाणी आहे. यात दोघेही आप-आपले कौशल्य दाखवतील यात काही शंकाच नाही.
विदुयतला आफ्टरमैथ’बाबत विचारले असता तो म्हणतो '' श्वार्जनेगरने स्वबळावर आपले एक स्थान प्रस्थापित केले आहे. श्वार्जनेगरने नेहमीच अॅक्शन चित्रपटांना एक वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. त्याने अॅक्शन चित्रपटाला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळवून दिला आहे. अरनॉल्ड ह्या चित्रपट मध्ये अजून काही वेगळे करून दाखवले आहे. हा चित्रपट मला नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहे"