काय होते सुशांतच्या टी-शर्टवर लिहिलेल्या 'Schrodinger's Smiley' मागचे ‘सीक्रेट’?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2020 12:33 PM2020-11-09T12:33:00+5:302020-11-09T12:39:50+5:30
सुशांतच्या स्माईलमागचे सीक्रेट...
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या मृत्यूला जवळपास पाच महिन्यांचा कालावधी उलटला. मात्र अद्यापही त्याच्या मृत्यूचे गूढ कायम आहे. तूर्तास सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय. या व्हिडीओत एक महिला सुशांतच्या हास्यामागे दडलेल्या रहस्याबद्दल बोलताना दिसतेय. सुशांतच्या टी-शर्टवर लिहिलेल्या एका मॅसेजमागे किती गर्भित रहस्य दडलेले होते, हेही ती सांगतेय.
नवभारत टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, हा व्हिडीओ प्रीति देशवाल नामक महिलेने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. यात सुशांतचे ब्लॅक टी-शर्ट आणि त्यावर बसलेली स्माईली याबद्दल ती सांगतेय. ‘सीक्रेट बिहाईन्ड सुशांत स्माईल’ असे तिने या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेले आहे.
व्हिडीओत ती सांगते, 'Schrodinger's Smiley' एक लिहिलेले ब्लॅक टी-शर्ट . अनेक मुलाखतीत, फोटोत, व्हिडीओजमध्ये सुशांतने हे टी-शर्ट घातलेले मी पाहिले आहे. 'Schrodinger's Smiley' काय आहे. ही संकल्पना सायन्सच्या एका खूप रोचक ‘थॉट एक्सपेरिमेंट’वर आधारित आहे. थॉट एक्सपेरिमेंट म्हणजे, असा प्रयोग ज्याबद्दल शास्त्रज्ञांनी विचार केला, चर्चा केली मात्र प्रत्यक्षात हा प्रयोग कधी साकारला नाही. म्हणजे हेएक्सपेरिमेंट इमॅजनरी आहे. अर्थात हा एक काल्पनिक प्रयोग आहे.
मी ही सेम टी-शर्ट मागवली. त्यावर एक स्माईली बनलेली आहे. जी एकीकडून हॅपी आहे आणि दुसरीकडून सॅड. म्हणजे, ही टी-शर्ट हॅपी व सॅड दोन्ही आहे. मात्र Schrodinger कोण आहे? Erwin Schrodinger ऑस्ट्रियन आयरिश क्वॉन्टम फिजिस्ट होते. कॉन्टम थिअरीवर ते सखोल अभ्यास करत होते. क्वॉन्टम फिजिक्स किती विचित्र आहे,हे सिद्ध करण्यासाठी त्यांनी एक काल्पनिक प्रयोग केला. यात एका मांजरीला काही रेडिओ अॅक्टिव्ह सबस्टंससोबत सील केले जाईल. बॉक्समध्ये बॉम्ब आहे. रेडिओअॅक्टिव्ह पदार्थाच्या संपर्कात येताच त्याचा स्फोट होईल आणि मांजर मरेल. हा काल्पनिक प्रयोग आहे.
क्वॉन्टम मॅकेनिस्टच्या शास्त्रज्ञांच्या मते, जोपर्यंत कोणी पाहणारा असत नाही, तोपर्यंत आपले वास्तव सुपरपोजिशन स्टेटमध्ये राहते. याचा अर्थ, अनेक गोष्टी आतमध्ये एकत्र घडत असतात. मात्र अचानक कोणी तुम्हाला ऑब्जर्व केलेच तर यापैकी एका गोष्टीवर तुम्ही येऊन थांबता आणि ती एकच गोष्ट ऑब्जर्व करणा-या समोरच्याला दिसते.
या व्हिडीओमध्ये Schrodinger च्या प्रयोगाशी संबंधित अनेक गोष्टींवर प्रकाश टाकण्यात आला आहे. या प्रयोगाला Schrodinger cat च्या नावाने ओळखले जाते. ज्याचा ह्युमन सायकॉलॉजीशी घनिष्ठ संबंध आहे