पहा ‘राब्ता’चा फर्स्ट लुक; सुशांत सिंग राजपूत अन् क्रिती सॅननची जमली केमिस्ट्री!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2017 09:30 AM2017-04-14T09:30:27+5:302017-04-14T15:02:07+5:30

सुशांत सिंग राजपूत आणि क्रिती सॅनन स्टारर ‘राब्ता’ या चित्रपटाचा फर्स्ट लुक रिलीज करण्यात आला असून, पहिल्याच लुकने प्रेक्षकांच्या हृदयाचे ठोके वाढविले आहेत.

See 'First Look' of Rabta; Sushant Singh Rajput and Kryti Sanan's Jamie chemistry! | पहा ‘राब्ता’चा फर्स्ट लुक; सुशांत सिंग राजपूत अन् क्रिती सॅननची जमली केमिस्ट्री!

पहा ‘राब्ता’चा फर्स्ट लुक; सुशांत सिंग राजपूत अन् क्रिती सॅननची जमली केमिस्ट्री!

googlenewsNext
शांत सिंग राजपूत आणि क्रिती सॅनन स्टारर ‘राब्ता’ या चित्रपटाचा फर्स्ट लुक रिलीज करण्यात आला असून, पहिल्याच लुकने प्रेक्षकांच्या हृदयाचे ठोके वाढविले आहेत. कारण या चित्रपटातून प्रेक्षकांना रिअल लाइफ कपलचा रोमान्स आॅनस्क्र्रीन बघावयास मिळणार आहे. दरम्यान, फर्स्ट लुकवरून सुशांत आणि क्रितीची केमिस्ट्री रंगल्याचे स्पष्टपणे बघावयास मिळत आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन दिनेश विजान यांनी केले आहे. 

सुशांत आणि क्रितीने चित्रपटाचा फर्स्ट लुक अतिशय हटके अंदाजात रिलीज केला आहे. सोशल मीडियावर रिलीज केलेल्या या लुकमध्ये सुशांत आणि क्रिती एकत्र बघावयास मिळत आहेत. क्रितीने या फर्स्ट लुकला ट्विटर शेअर करताना लिहिले की, ‘काही तरी आहे, जे मला त्याच्याकडे आकर्षित करते, एक कनेक्शन जे मी शब्दात सांगू शकत नाही’. तर सुशांतनेही फर्स्ट लुक शेअर करताना लिहिले की, ‘मी विचार करीत आहे की, तिनेही असाच विचार केला असावा जो मी केला होता. आमच्यात काय कनेक्शन आहे, ते तुम्ही खाली शेअर केलेल्या फर्स्ट लुकमध्ये बघू शकता’. 
 

चित्रपटाचे निर्माता होमी अदाजानिया आहेत, तर प्रीतमने चित्रपटातील गाणी कम्पोज केली आहेत. जेव्हा क्रिती आणि सुशांतने या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली होती, तेव्हापासून या दोघांमध्ये काही तरी खिचडी शिजत असल्याची चर्चा होती. तसेच हे दोघे एकमेकांना डेट करीत असल्याच्या अफवाही पसरविण्यात आल्या. 

या चित्रपटाविषयीची आणखी एक महत्त्वपूर्ण बाब म्हणजे यामध्ये अभिनेत्री दीपिका पादुकोण कॅमिओ करणार आहे. हा चित्रपट येत्या ९ जून रोजी रिलीज केला जाणार आहे. दरम्यान, फर्स्ट लुकला प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळत असल्याने चित्रपटाविषयीची आतुरता आणखीनच वाढली आहे. 

Web Title: See 'First Look' of Rabta; Sushant Singh Rajput and Kryti Sanan's Jamie chemistry!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.