घोड्यावर स्वार झाला आयुष्यमान खुराणा, दिवसभर फिरला दिल्लीच्या रस्त्यावर !
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2020 13:39 IST2020-02-18T13:35:03+5:302020-02-18T13:39:52+5:30
Shubh Mangal Zyada Saavdhan Movie : शुभ मंगल ज्यादा सावधान’ या सिनेमातील किसिंग सीनची चांगलीच चर्चा रंगली आहे.

घोड्यावर स्वार झाला आयुष्यमान खुराणा, दिवसभर फिरला दिल्लीच्या रस्त्यावर !
सिनेमाचं प्रमोशन करण्याचे निरनिराळे फंडे चित्रपटसृष्टीत पाहायला मिळतात. छोट्या पडद्यावरच्या शोमध्ये येऊन सिनेमाचं प्रमोशन करण्याचा फंडा हिट झाला असताना आयुष्यमान खुराणाने मात्र वेगळी वाट धरलीय. त्याने थेट दिल्लीच्या रस्त्यांवर चक्क वरातच काढत त्याने आपला आगामी 'शुभ मंगल ज्यादा सावधान' सिनेमाचे प्रमोशन केलं. यावेळी आयुष्यमान घोड्यावर स्वार झालेला पाहायला मिळतोय तर संपूर्ण स्टारकास्ट वरातीत चालच असल्याचे पाहायला मिळतंय. सिनेमात आयुष्मान खुराणा आणि जीतेंद्र ने गे कपलची भूमिका साकारली आहे.
दोघेही एकमेकांच्या प्रेमात असून त्यांना लग्न करायचे असते. मात्र यावर त्याच्या कुटुंबाचा विरोध असतो. यानंतर काय घडते यावर सिनेमाची कथा आधारित आहे. सिनेमात जितेंद्र कुमार, नीना गुप्ता, गजराज राव, मनूऋषी चड्ढा, सुनीता राजवर आणि मानवी गागरू यांच्या भूमिका आहेत.आशा करुया की अनोख्या प्रमोशनप्रमाणे सिनेमाची कथासुद्धा रसिकांना अनोखी वाटावी.
सध्या ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’ या सिनेमातील किसिंग सीनची चांगलीच चर्चा रंगली आहे. पहिल्यांदाच एका पुरुष कलाकाराचे चुंबन घेण्याच्या दृश्याबद्दल आयुषमानने सांगितले की, “मला वाटते, एक कलाकार म्हणून अशा प्रसंगांची तयारी ठेवली पाहिजे. सिनेमात काम करत असताना तुम्हाला भूमिकेची जी मागणी असेल त्यासाठी तयार असावे लागते. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, हा संवेदनशील विषय थोडा हलकाफुलका करण्यासाठी हे दृश्य सिनेमात असणे गरजेचे होते असे मला वाटते. सर्वोच्च न्यायालयाने कलम 377 काढून टाकले असले तरी अजूनही ते निषिद्ध मानले जाते. बरेच लोक म्हणतात की, समलैंगिक संबंध नैसर्गिक नाहीत. त्यांचा विश्वास बसण्यासाठी आणि ही संकल्पना त्यांना समजण्यासाठी हे दृश्य सिनेमात असणे आवश्यक होते.”