SEE : इस्त्रायलच्या पंतप्रधानांची ‘किमया’! १५ वर्षांनंतर पुन्हा एकत्र आलेत ऐश्वर्या राय अन् विवेक ओबेरॉय!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2018 05:29 AM2018-01-19T05:29:02+5:302018-01-19T10:59:02+5:30
इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू सध्या भारत दौ-यावर आहेत. याच नेतान्याहू यांनी आपल्या भारत दौ-यात एक किमया केली. होय, त्यांच्या ...
इ ्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू सध्या भारत दौ-यावर आहेत. याच नेतान्याहू यांनी आपल्या भारत दौ-यात एक किमया केली. होय, त्यांच्या भारत दौ-याने ऐश्वर्या राय बच्चन आणि विवेक ओबेरॉय यांना कधी नव्हे ते तब्बल १५ वर्षांनंतर एकत्र आणले. होय, बच्चन कुटुंबाची सून बनण्यापूर्वी ऐश्वर्या व विवेक रिलेशनशिपमध्ये होते, हे आता जगजाहिर आहे. सलमानसोबत ब्रेकअप झाल्यानंतर ऐश्वर्याच्या आयुष्यात विवेकची एन्ट्री झाली होती. सलमानच्या वागणुकीने त्रस्त झालेल्या ऐश्वर्याला अचानक विवेकची कंपनी आवडू लागली होती. ‘क्यों हो गया ना’ या चित्रपटाच्या सेटवर तर विवेक व ऐश्वर्या आणखीच जवळ आले होते. इतके की, ऐशच्या ३० व्या वाढदिवसाला विवेकने तिला ३० गिफ्ट दिले होते. ऐश्वर्याने विवेकसोबतचे नाते कधीही मान्य केले नाही. पण त्याकाळात दोघेही प्रत्येक इव्हेंटमध्ये एकत्र जात. हे प्रेम बहरत असतानाच, विवेकने एकदिवस अचानक पे्रस कॉन्फरन्स बोलवली आणि मला सलमानकडून धमक्या येत असल्याचे मीडियासमोर सांगून खळबळ उडवून दिली. विवेकच्या या प्रेस कॉन्फरन्सचा काय अर्थ काढायचा तो ऐश्वर्याने काढला आणि माझे या प्रकरणाशी काहीही देणेघेणे नाही असे सांगून ती विवेकपासून कायमची दूर गेली. पुढे तिने अभिषेकशी लग्न केले.
ALSO READ : ऐश्वर्या राय बच्चनने नणंद श्वेता बच्चनमुळे ‘मिस’ केली फराह खानची बर्थ डे पार्टी?
लग्नानंतर गत १५ वर्षांच्या काळात ऐश्वर्या व विवेक कधीच एकमेकांसमोर आले नाहीत. पण नेतान्याहू यांनी मात्र ऐश्वर्या व विवेकला एकत्र आणलेच. केवळ एकत्र नाही तर एका फ्रेममध्ये आणले. गुरूवारी नेतान्याहू यांनी बॉलिवूड कलाकारांची भेट घेतली. बॉलिवूड कलाकारांना भेटून नि:शब्द झाल्याचे नेतान्याहू यांनी यावेळी सांगितले. यावेळी बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय-बच्चन, अभिषेक बच्चन, करण जोहर, इम्तियाज अली, मधुर भंडारकर, विवेक ओबेरॉय, प्रसून जोशी यांच्यासह अनेक कलाकार उपस्थित होते. या सगळ्यांमध्ये ऐश्वर्या आणि विवेक यांच्या उपस्थितीचीच चर्चा अधिक रंगली. यावरून नेटिजन्सनी ऐश्वर्याला ट्रोलही केले. बच्चन व ओबेरॉय एका फ्रेममध्ये असूच शकत नाही, असे एकाने लिहिले तर अरे, हे काय झाले, असे दुसºया एका ट्रोलरने लिहिले.