पाहा, ‘पॅडमॅन’चे ‘हू ब हू’ गाणे!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2018 06:22 AM2018-01-04T06:22:08+5:302018-01-04T11:52:08+5:30
अक्षय कुमार स्टारर ‘पॅडमॅन’च्या ट्रेलरने आधीच लोकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. यानंतर रिलीज झालेल्या चित्रपटांच्या गाण्यांनीही लोकांना वेड लावले आहे. आज या चित्रपटाचे एक आणखी दुसरे गाणे रिलीज झाले.
अ ्षय कुमार स्टारर ‘पॅडमॅन’च्या ट्रेलरने आधीच लोकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. यानंतर रिलीज झालेल्या चित्रपटांच्या गाण्यांनीही लोकांना वेड लावले आहे. आज या चित्रपटाचे एक आणखी दुसरे गाणे रिलीज झाले. ‘हू ब हू’ असे या गाण्याचे शब्द आहेत. हे गाणे ऐकून तुम्ही पुन्हा एकदा अक्षय कुमारच्या प्रेमात पडल्यावाचून राहणार नाहीत.
सोनम कपूरच्या संवादाने या गाण्याची सुरूवात होते. ‘तुम करोडपती बनने वाले हो,’ असे सोनम अक्षयला म्हणते. यावर ‘करोड़ों बनने से क्या होगा ? दांत साफ करने वाले प्लास्टिक ब्रुश के हैंडल पर सोने का हैंडल होगा लेकिन दांत के कीड़े तो प्लास्टिक के ब्रुश से ही निकलेंगे न जी।’, असे अक्षय तिला म्हणतो. यानंतर गाणे सुरू होते. या गाण्यात अक्षय कुमारच्या व्यक्तिरेखेचा संपूर्ण प्रवास दाखवला गेला आहे. अमित त्रिवेदीने कम्पोज केलेल्या या गाण्याचे शब्द लिहिले आहेत कौसर मुनीर यांनी. राजीव व सुहास सावंत यांनी गाण्याला स्वरबद्ध केले आहे.
ALSO READ : Padmans Title Track Out : अक्षय कुमारचा संपूर्ण प्रवास फक्त एका गाण्यात!
‘पॅडमॅन’ या चित्रपटात अक्षय कुमार अरूणाचलम मुरूगनाथनची भूमिका साकारताना दिसतोय. अरूणाचलम यांनी आपल्या गावातील महिलांना माफक दरात सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देऊ, अशी शपथ घेतली होती. काही दिवसांपूर्वी ‘पॅडमॅन’चा ट्रेलर आऊट झाला होता. ‘सुपरहिरो है ये पगला’ अशी या चित्रपटाची टॅगलाईन आहे. ‘पॅडमॅन’ या चित्रपटात अक्षय व राधिका आपटे या दोघांशिवाय सोनम कपूरही मुख्य भूमिकेत आहेत. केवळ इतकेच नाही तर या चित्रपटासोबत अक्षयची पत्नी ट्विंकल खन्ना निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवतेय. हा चित्रपट ट्विंकलने प्रोड्यूस केलेला आहे. चित्रपटात राधिका अक्षयच्या पत्नीच्या भूमिकेत आहे; तर सोनम अक्षयवर प्रेम करत असल्याचे दाखवण्यात येणार आहे. महानायक अमिताभ बच्चन हेदेखील या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.