पाहा पायल रोहतागीला या विमानातून का बाहेर उतरविले

By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2017 05:27 PM2017-01-07T17:27:32+5:302017-01-07T17:29:23+5:30

अभिनेत्री पायल रोहतगीने फेसबुक लाइव्ह करुन एक नावाजलेल्या विमान कंपनीवर आपला राग व्यक्त केला. पायलच्या मते ती हिंदू असल्यामुळे तिला जेट एअरवेजमधून उतरवण्यात आले होते. ती मुंबई- त्रिवेंद्रम विमानातून जाण्यासाठी मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनलवरुन प्रवास करत होती, असे वृत्त जनसत्ता या संकेतस्थळाने प्रसिद्ध केले आहे.

See, Payal Rohtagi got out of this plane | पाहा पायल रोहतागीला या विमानातून का बाहेर उतरविले

पाहा पायल रोहतागीला या विमानातून का बाहेर उतरविले

googlenewsNext
िनेत्री पायल रोहतगीने फेसबुक लाइव्ह करुन एक नावाजलेल्या विमान कंपनीवर आपला राग व्यक्त केला. पायलच्या मते ती हिंदू असल्यामुळे तिला जेट एअरवेजमधून उतरवण्यात आले होते. ती मुंबई- त्रिवेंद्रम विमानातून जाण्यासाठी मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनलवरुन प्रवास करत होती, असे वृत्त जनसत्ता या संकेतस्थळाने प्रसिद्ध केले आहे.

पायल आपल्या पतीसोबत म्हणजे संग्राम सिंगसोबत सकाळी ६.५० चे विमान पकडण्यासाठी ६.२० पर्यंत पोहोचली होती. पायलच्या मते, विमानातील मुसलमान कर्मचाऱ्यांनी तिच्यासोबत गैरवर्तवणुक केली आणि तिला विमानातून उतरवण्यात आले. पायलने फेसबुक व्हिडिओमध्ये जेट एअरवेजला फार सुनावले आणि पुढे कधीही जेट एअरवेजने प्रवास न करण्याचा निश्चयही केला. तिने बिझनेस क्लासचे तिकिट काढले होते. पण त्याचे पैसेही तिला परत करण्यात आले नाही. पायल म्हणाली की, पैसे काही झाडाला लागत नाहीत. पायलने हा व्हिडिओ विमानतळाच्या बाहेरचा काढला होता. पायलने यासंबंधीत अनेक ट्विटही केले आहेत ज्यात तिने लोकांच्या प्रश्नांना उत्तरे दिली आहेत.

कोणत्याही व्यक्तिला विमानातून प्रवास करायचा असतो त्यांना हे माहित असते की दिलेल्या वेळेच्या किमान २० मिनिटं ते अर्धा तास आधीच विमानतळावर पोहोचणे आवश्यक असते. विमानातून प्रवास करताना बस किंवा रेल्वेसारखे शेवटच्या मिनिटाला तिकिट काढू शकत नाही. पहिल्यांदा प्रवास करणाऱ्या प्रवासाला कदाचीत हे माहित नसेल पण कलाकार मात्र अनेकदा विमानानेच प्रवास करत असतात तरीही त्यांना अशा अनुभवांना सामोरे जावे लागते.

Web Title: See, Payal Rohtagi got out of this plane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.