See Photo :लग्नाच्या दिड महिन्यानंतर हनीमूनसाठी रवाना झाले Deepika Padukone आणि Ranveer Singh
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2018 11:22 IST2018-12-30T11:21:30+5:302018-12-30T11:22:58+5:30
विविध देशाचे पर्यटन मंडळं रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण या नवदाम्पत्याला सुंदर ठिकाणी हनीमूनला जाण्यासाठी खास आमंत्रण पाठवण्यात आले होते.

See Photo :लग्नाच्या दिड महिन्यानंतर हनीमूनसाठी रवाना झाले Deepika Padukone आणि Ranveer Singh
अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि अभिनेता रणवीर सिंह रेशीमगाठीत अडकून आता दिड महिना झाला. कामाच्या व्यस्त शेड्युलमुळे दोघांनाही एकमेकांबरोबर वेळ घालवण्यासाठी पाहिजे तसा वेळ मिळत नव्हता. दोघांच्या लग्नाकडे फॅन्स आणि बॉलीवुडसह अवघ्या जगाचं लक्ष लागलं होते अगदी त्याचप्रमाणे हे दोघे हनीमूनसाठी कोणत्या ठिकाणी जाणार याचीही सा-यांना उत्सुकता होती. अखेर वेळात वेळ काढून दोघेही हनीमूनसाठी रवाना झाले आहेत. शनीवारी रात्री मुंबई एअरपोर्ट वर दोघेही हातात हात घालून दिसले..विशेष म्हणजे दोघांनीही यावेळी ब्लॅक कलरचे ड्रेस परिधान केले होते. रणवीरने ब्लॅक पॅंट, प्लेन टी-शर्ट आणि बाइकर लेदर जॅकेट परिधान केला होता.तर दीपिकाने ही ब्लॅक स्कर्ट आणि जैकेट परिधान केला होता. नेहमीप्रमाणे यावेळीही दोघांच्या हटके स्टाइल स्टेटमेंटही सा-यांचे लक्ष वेधून घेत असल्याचे पाहायला मिळत आहे. दोघांसाठी त्यांचे हनीमूनही थोडे खास असणार आहे. ते म्हणजे लग्नानंतर त्यांचे हे पहिले न्यु इअर असणार आहे.
विशेष म्हणजे दोघांनाही विविध देशांच्या पर्यटन मंडळांकडून पेड हनीमून ट्रीप पॅकेजेस ऑफर करण्यात आले होते. यांत स्वित्झर्लंड पर्यटन मंडळ आघाडीवर होते. कारण रणवीर सिंह हा स्वित्झर्लंड पर्यटन मंडळाचा भारतातील ब्रँड अॅम्बेसेडर आहे. या नवदाम्पत्याला सुंदर ठिकाणी हनीमूनला जाण्यासाठी खास आमंत्रण पाठवण्यात आले होते.
इटलीत लग्न झाल्यानंतर मुंबई आणि बंगळुरूमध्ये दोघांनी लग्नाचे शानदार रिसेप्शन दिले होते.त्यामुळे पूर्ण नोव्हेंबर यांत निघून जाणार असल्याने मोठ्या हनीमूनचे कोणतेही प्लानिंग दीपवीरने केलेलं नव्हते. रिसेप्शन सोहळा संपन्न झाल्यानंतर लगेचच डिसेंबरमध्ये रणवीर पुन्हा बिझी झाला.'सिम्बा' सिनेमाचे प्रमोशनमध्ये तो व्यस्त होता. त्यामुळे मोठ्या हनीमूनचे दीपवीरचे कोणतेही प्लानिंग नसल्याचे समोर आले होते.