SEE PIC : ‘पद्मावती’मधील रणवीरचा लुक झाला लिक!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2017 10:47 AM2017-04-13T10:47:57+5:302017-04-13T16:17:57+5:30

गेल्या काही दिवसांपासून कलाकारांपेक्षा वादांमुळेच अधिक चर्चेत असलेला संजय लीला भंसाळी यांचा बहुचर्चित ‘पद्मावती’ या चित्रपटातील अभिनेता रणवीर सिंग ...

SEE PIC: 'Padmavati' became the look of the Ranveer! | SEE PIC : ‘पद्मावती’मधील रणवीरचा लुक झाला लिक!

SEE PIC : ‘पद्मावती’मधील रणवीरचा लुक झाला लिक!

googlenewsNext
ल्या काही दिवसांपासून कलाकारांपेक्षा वादांमुळेच अधिक चर्चेत असलेला संजय लीला भंसाळी यांचा बहुचर्चित ‘पद्मावती’ या चित्रपटातील अभिनेता रणवीर सिंग याचा लुक लिक झाला आहे. रणवीरसह, दीपिका पादुकोण, शाहिद कपूर हेही चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहेत. काही दिवसांपूर्वीच संजय लीला भंसाळी यांना धमकावल्याची बातमी समोर आली होती. आता रणवीरचा लुक लिक झाल्याने पुन्हा एकदा चित्रपट चर्चेत आला आहे. 

सध्या रणवीरचा हा लुक सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मात्र त्याचा हा लुक रिअल की फेक हे मात्र अद्यापपर्यंत स्पष्ट झाले नाही. परंतु रणवीरचा लुक बघून संजय लीला भंसाळी यांच्या चित्रपटांच्या स्टाइलशी साम्य साधणारा असल्याचे स्पष्ट होते. चित्रपटात रणवीर अल्लाउद्दीन खिलजीच्या भूमिकेत दिसणार आहे. दरम्यान, या लिक झालेल्या लुकमध्ये रणवीरने अतिशय टाइट कपडे परिधान केलेले आहेत. राजा-महाराजांच्या या वेशभूषेत रणवीर एखाद्या महाराजासारखा दिसत आहे. डोळ्यात सुरमा आणि हातात तलवार असलेला रणवीरखूपच रुबाबदार दिसत आहे. 



संजय लीला भंसाळी यांचा ‘पद्मावती’ हा चित्रपट चितौडगढची राणी पद्मिनी आणि बादशाह अलाउद्दीन खिलजी यांच्या प्रेमकथेवर आधारित आहे. यामुळेच काही कट्टरपंथीयाकडून ‘पद्मावती’ला तीव्र विरोध केला जात आहे. अशातही संजय लीला भंसाळी यांनी स्पष्ट केले की, ‘पद्मावती’ हा चित्रपट ठरलेल्या वेळेतच रिलीज केला जाणार आहे. रणवीरच्या या लुकमुळे चित्रपटाची जणू काही झलकच बघावयास मिळत असून, त्यामध्ये रणवीरचा तामजाम बघण्यासारखा आहे. त्यामुळे रणवीरचा हा लुक तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा. 

Web Title: SEE PIC: 'Padmavati' became the look of the Ranveer!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.