SEE PICS: असा आहे अक्षय कुमारचा 80 कोटींचा आलिशान आशियाना, आतून दिसतो असा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2020 10:25 AM2020-01-11T10:25:06+5:302020-01-11T10:29:25+5:30

सलमान शाहरूखप्रमाणे अक्षय कुमारच्याही घराचे आतील छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

SEE PICS: Akshay Kumar House Inside & Outside View Photos with Family | SEE PICS: असा आहे अक्षय कुमारचा 80 कोटींचा आलिशान आशियाना, आतून दिसतो असा

SEE PICS: असा आहे अक्षय कुमारचा 80 कोटींचा आलिशान आशियाना, आतून दिसतो असा

googlenewsNext

आपलं स्वप्नातलं घरा खास असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असते.हे स्वप्नपूर्ण करण्यासाठी प्रत्येक जण झटत असतो. प्रत्येकाच्या स्वप्नातील घराच्या कल्पना या वेगवेगळ्या असतात. त्या दृष्टीने आपल्या स्वप्नातलं घर घडवण्यासाठी प्रत्येक व्यक्ती मेहनत करत असतो.याला कलाकार मंडळीही अपवाद नसतात.


सेलिब्रिटींचं घर कसं असेल, त्यांच्या घरात काय आहे, त्यांनी घर कसं सजवलं आहे हे जाणून घेण्याची रसिकांना उत्सुकता असते. त्यांच्या आयुष्यातील विशेषतः घराबाबत प्रत्येक गोष्ट ऐकायला मिळावी किंवा त्याची माहिती मिळावी अशी रसिकांची इच्छा असते. प्रत्येक सेलिब्रिटी मुंबईत आलिशान घरात राहतात. बॉलीवुडचा खिलाडी अक्षय कुमारचंही घर असंच आलिशान आहे.  सलमान शाहरूखप्रमाणे यांच्याही घराचे आतील छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 


मुंबईतील जुहू परिसरात त्याचे आलिशान घर आहे. तब्बल 80 कोटींचे हे घर आहे. घराचं इंटिरीअर सजवण्यासाठी अक्षय आणि ट्विंकल खन्नाने बरीच मेहनत घेतली आहे.  डायनिंगपासून पूल एरियापर्यंत घराचा कोपरा अन् कोपरा सजवण्यासाठी दोघांनी बरीच मेहनत घेतली असून कुणाचंही लक्ष आकर्षित करेल. हे घर पाहून आपसुकच तुमच्या तोंडातून अतिसुंदर, अमेझिंग असे शब्द बाहेर पडले नाही तरच नवल. एका फोटोत अक्षय  आपल्या मुलासह किचनमध्ये जेवण बनवताना पाहायला मिळत आहे.

हा त्यांच्या घरातील लिव्हींग रुम, पुस्तकांची लायब्ररी,  डायनिंग एरिया आहे, घराच्या मागच्या बाजुला गार्डन अशा पद्धतीने घराचे इंटेरिअरही खास पद्धतीने डिझाईन करण्यात आले आहे.

Web Title: SEE PICS: Akshay Kumar House Inside & Outside View Photos with Family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.