See Pics : अर्जुन कपूर ‘टेरेस जिम’वर असा चालला हातोडा...!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2017 01:28 PM2017-01-03T13:28:07+5:302017-01-03T13:28:07+5:30

अर्जुन कपूरने मोठ्या आवडतीने त्याच्या घराच्या छतावर एक अद्ययावत जिम उभारले होते. पण अखेर हे जिम जमिनदोस्त झाले. होय, ...

See Pics: Arjun Kapoor walks on a Terrace gym! | See Pics : अर्जुन कपूर ‘टेरेस जिम’वर असा चालला हातोडा...!

See Pics : अर्जुन कपूर ‘टेरेस जिम’वर असा चालला हातोडा...!

googlenewsNext
्जुन कपूरने मोठ्या आवडतीने त्याच्या घराच्या छतावर एक अद्ययावत जिम उभारले होते. पण अखेर हे जिम जमिनदोस्त झाले. होय, बृहन्मुंबई महापालिकेने या जिमचे बांधकाम अवैध ठरवत, अखेर त्यावर हातोडा चालवलाच. विशेष म्हणजे, यासाठी आलेला सगळा खर्च अर्जुनच्या खिश्यातून वसूल केला जाणार आहे. 
हे जिम जमिनदोस्त करण्यासाठी महापालिकेच्या कर्मचा-यांना तीन दिवस लागले. एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, यासाठी अंदाजे १० हजार रूपयांचा खर्च आला. हा खर्च अर्जुनकडून वसूल करण्यात येणार आहे. खरे तर १० हजार रुपए अर्जुनसाठी फार मोठे नाही. पण मनापासून बनवलेले जिम डोळ्यादेखत पडताना पाहण्यासारखी मोठी किंमत अर्जुनला चुकवावी लागली आहे.







cnxoldfiles/16 स्केअर जागेवर जिम उभावले होते. महापालिकेच्या अधिकाºयांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्जुनने यासाठी पूर्वपरवानगी घेतली नव्हती. अर्जुन जुहूतीलएका अपार्टमेंटच्या सातव्या माळ्यावर राहतो. अर्जुनच्या बिल्डिंगमधील कुठल्याही रहिवाशाने नाही  तर एका कार्यकर्त्याने अर्जुनच्या या अवैध बांधकामाविरोधात तक्रार नोंदवली. यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेने त्वरित कारवाई करत, अर्जुनला मार्चमध्ये पहिले नोटीस जारी केले होते. टेरेस  जिमबद्दलचे सर्व कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश याद्वारे अर्जुनला देण्यात आले होते. यानंतर अर्जुनच्या मॅनेजरने हे अवैध बांधकाम वैध करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी काही मुदत देण्याची विनंती केली होती. त्यानुसार अर्जुनला काही महिन्यांची मुदत दिली गेली. पण यादरम्यान त्याच्याकडून कुठल्याही कागदपत्रांची पूर्तता झाली नाही. हे पाहून महापालिकेने त्याला दुसरे नोटीस जारी करीत  हे  जिम जमीनदोस्त करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार हे जिम जमिनदोस्त करण्यात आले.

Web Title: See Pics: Arjun Kapoor walks on a Terrace gym!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.