SEE PICS : लग्नानंतर होणार ग्रॅण्ड रिसेप्शन, दीपवीर बेंगळुरुला रवाना!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2018 11:47 AM2018-11-20T11:47:58+5:302018-11-20T11:53:47+5:30

येत्या २१ नोव्हेंबरला बेंगळुरू येथे आणि यानंतर २८ नोव्हेंबरला मुंबईत दीपवीरच्या लग्नाचे रिसेप्शन होणार आहे.

SEE PICS: deepika padukone ranveer singh bengaluru reception spotted at mumbai airport | SEE PICS : लग्नानंतर होणार ग्रॅण्ड रिसेप्शन, दीपवीर बेंगळुरुला रवाना!

SEE PICS : लग्नानंतर होणार ग्रॅण्ड रिसेप्शन, दीपवीर बेंगळुरुला रवाना!

googlenewsNext
ठळक मुद्दे येत्या २१ नोव्हेंबरला बेंगळुरू येथे आणि यानंतर २८ नोव्हेंबरला मुंबईत दीपवीरच्या लग्नाचे रिसेप्शन होणार आहे.यावेळी दोघेही एकमेकांसोबत अतिशय आनंदी दिसले. दोघेही हसत हसत मीडियाच्या कॅमे-यांना सामोरे गेलेत.

दीपिका पादुकोण- रणवीर सिंग यांचा लग्नसोहळा पार पडला. हा सोहळा अतिशय खासगी असल्याने यावेळी केवळ रणवीर व दीपिकाचे अतिशय जवळचे नातेवाईक तेवढेच हजर होते. त्यामुळे लग्नसोहळ्यात सामील न होऊ शकलेल्या आप्तांसाठी दीपवीर ग्रॅण्ड रिसेप्शन देणार आहेत. येत्या २१ नोव्हेंबरला बेंगळुरू येथे आणि यानंतर २८ नोव्हेंबरला मुंबईत दीपवीरच्या लग्नाचे रिसेप्शन होणार आहे. तूर्तास यापैकी पहिल्या रिसेप्शनची जोरदार तयारी सुरु आहे. दीपिका व रणवीर आज सकाळी या रिसेप्शनसाठी बेंगळुरुला रवाना झालेत.

बेंगळुरूला रवाना होण्यापूर्वीचे मुंबई विमानतळावरचे दोघांचेही फोटो तूर्तास वेगाने व्हायरल होत आहेत. विमानतळावर रणवीर व दीपिका दोघेही पांढऱ्या रंगाचे आऊटफिटमध्ये दिसलेत.

दीपिकाच्या गळयातील मंगळसूत्राने तसेच हातातील लाल चुड्याने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी दोघेही एकमेकांसोबत अतिशय आनंदी दिसले. दोघेही हसत हसत मीडियाच्या कॅमेºयांना सामोरे गेलेत.हे फोटो तुम्हीही पाहा आणि कसे वाटले ते आम्हाला जरूर कळवा.


गत १४ व १५ नोव्हेंबरला इटलीत रणवीर-दीपिका विवाहबद्ध झालेत. दोघांनीही कोंकणी आणि सिंधी अशा दोन्ही पद्धतीने विवाह केला.


लग्नानंतर दीपवीर भारतात तीन रिसेप्शन देणार आहेत. होय, येत्या २१ नोव्हेंबरला बेंगळुरू येथे दीपवीरच्या लग्नाचे पहिले रिसेप्शन होईल. दीपिकाचे आई-वडिल हे रिसेप्शन होस्ट करतील. यानंतर येत्या २८ नोव्हेंबर आणि १ डिसेंबरला मुंबईच्या ग्रण्ड हयात हॉटेलमध्ये दुसरे व तिसरे रिसेप्शन होणार आहे. २८ तारखेच्या रिसेप्शला केवळ मित्र आणि कुटुंबीय असतील. तर १ डिसेंबरचे रिसेप्शन केवळ बॉलिवूडमधील मित्रपरिवारासाठी असेल.

Web Title: SEE PICS: deepika padukone ranveer singh bengaluru reception spotted at mumbai airport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.