SEE PICS : ‘पद्मावत’पेक्षाही सुंदर आहे दीपिका पादुकोणचा हा नवा अंदाज!!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2018 10:33 AM2018-02-05T10:33:55+5:302018-02-05T16:18:44+5:30
दीपिका पादुकोण गेल्या काही दिवसांपासून तिच्या ग्लॅमरस फोटोशूटमुळे चर्चेत आहे. पण आता तिचे नवे फोटोशूट चर्चेत आले आहे. सुप्रसिद्ध ...
द पिका पादुकोण गेल्या काही दिवसांपासून तिच्या ग्लॅमरस फोटोशूटमुळे चर्चेत आहे. पण आता तिचे नवे फोटोशूट चर्चेत आले आहे. सुप्रसिद्ध फॅशन डिझाईनर सब्यसाची यांच्यासाठी दीपिकाने हे फोटोशूट केले आहे. यात दीपिकाचा वेगळाच अंदाज पाहायला मिळतो आहे. या फोटोशूटसाठी दीपिकाने पारंपरिक अवतार धारण केला आहे. सब्यसाची यांनी दीपिकाचा हा नवा अंदाज सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोसोबत आपल्या काही स्मृतीही त्यांनी शेअर केल्या आहेत.
एका फोटोत दीपिकाने गोल्डन रंगाची साडी परिधान केली आहे. त्यावरची तिची मॅचिंग ज्वेलरी तिच्या सुंदरतेत भर घातले आहे.
एका फोटोत दीपिका पारंपरिक भारतीय नारीच्या रूपात दिसतेय. या कलेक्शची प्रेरणा मला माझ्या आईकडून मिळाली, असे हा फोटो शेअर करताना सब्यसाची यांनी लिहिले आहे.
या फोटोत दीपिकाच्या माथ्यावरचा पारंपरिक ‘बेंदा’ आणि कपाळावरचे कुंकू लक्ष वेधून घेत आहेत. तिच्या डोळ्यातील चमक तर पाहात राहावी अशी आहे. सब्यसाची यांनी दीपिकाचे या फोटोशूटदरम्यानचे काही व्हिडिओही शेअर केले आहेत.
ALSO READ : ‘पद्मावत’च्या यशानंतर दीपिका पादुकोणचे ‘fun mode’ फोटोशूट! तुम्हीही पाहा!!
काल-परवा दीपिकाने वोग मॅगझिनसाठी फोटोशूट केले होते. या फोटोशूटमध्ये दीपिका अतिशय फन अॅण्ड लव्हिंग मूडमध्ये दिसली होती.
सध्या दीपिकाचे सर्वत्र कौतुक होत आहे. तिचा ‘पद्मावत’ सुपर डुपर हिट ठरला आहे. गेल्या दहा दिवसांत या चित्रपटाने २०० कोटी रूपयांचा टप्पा ओलांडला आहे. यामुळे दीपिका सध्या जाम खूश आहे. अर्थात भविष्यात ‘पद्मावत’सारखे ऐतिहासिक चित्रपट न करण्याचा निर्णय दीपिकाने घेतला आहे. भविष्यातही तू ‘पद्मावत’सारखे चित्रपट करणार का? असा प्रश्न तिला अलीकडे एका इव्हेंटमध्ये केला गेला होता. यावर ‘इतना सब होने के बाद कभी नहीं,’ असे उत्तर दीपिकाने दिले होते. दीपिकाच्या या चित्रपटाला करणी सेनेसारख्या राजपूत संघटनांनी प्रचंड विरोध केला होता. विरोध करणा-यांनी दीपिकाचे नाक कापण्याची धमकीही दिली होती.