See pics : ​कपिल शर्माची हिरोईन इशिता दत्ता अडकली लग्नबंधनात! १० वर्षे मोठ्या अभिनेत्याशी केले लग्न!!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2017 04:51 AM2017-11-29T04:51:23+5:302017-11-29T10:22:00+5:30

कपिल शर्माच्या ‘फिरंगी’ या चित्रपटातून लीड हिरोईन म्हणून डेब्यू करणारी अभिनेत्री इशिता दत्ता काल २८ नोव्हेंबरला लग्नबंधनात अडकली. मुंबईतील ...

See pics: Kapil Sharma's heroine Ishita Dutta gets stuck in marriage! 10 years old married actress !! | See pics : ​कपिल शर्माची हिरोईन इशिता दत्ता अडकली लग्नबंधनात! १० वर्षे मोठ्या अभिनेत्याशी केले लग्न!!

See pics : ​कपिल शर्माची हिरोईन इशिता दत्ता अडकली लग्नबंधनात! १० वर्षे मोठ्या अभिनेत्याशी केले लग्न!!

googlenewsNext
िल शर्माच्या ‘फिरंगी’ या चित्रपटातून लीड हिरोईन म्हणून डेब्यू करणारी अभिनेत्री इशिता दत्ता काल २८ नोव्हेंबरला लग्नबंधनात अडकली. मुंबईतील जुहू भागात असलेल्या इस्कॉन टेम्पलमध्ये इशिताचा विवाह सोहळा पार पडला. ‘फिरंगी’च्या रिलीजच्या काही दिवस आधी पार पडलेल्या या लग्नाची तारीख आधीपासून ठरलेली होती.  कारण आधी,‘फिरंगी’ २४ नोव्हेंबरला रिलीज होणार होता. पण नंतर ही तारीख लांबणीवर पडली. आता हा चित्रपट १ डिसेंबरला रिलीज होतो आहे.



आता इशिताचा वर कोण, हे लग्नापर्यंत कुणालाही ठाऊक नव्हते. लग्नानंतर इशिता व तिच्या वराचे फोटो समोर आलेत आणि मग कुठे नवरदेवाचे नाव सगळ्यांना कळले. होय, इशिताने अभिनेता वत्सल सेठसोबत लग्नगाठ बांधली.



वत्सल हा इशितापेक्षा १० वर्षांनी मोठा आहे. वत्सल व इशिता या दोघांनी ‘रिश्तों का सौदागर-बाजीगर’ या मालिकेत एकत्र काम केले होते. या मालिकेच्या सेटवर दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले.



इशिता व वत्सल यांच्या लग्नात अगदी जवळचे मित्र व नातेवाईक हजर होते. याशिवाय अजय देवगण, काजोल, बॉबी देओल व टॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी या सोहळ्याला हजेरी लावली. या लग्नाचे काही फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.



इशिताने २०१२ मध्ये तेलगू चित्रपटातून अ‍ॅक्टिंग डेब्यू केला होता. इशिता ही मिस इंडिया व बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्ताची बहीण आहे. लवकरच इशिता व तनुश्री दत्ता एकत्र काम करणार आहेत. इशिता चित्रपटांशिवाय टीव्ही मालिकांमध्येही दिसली आहे. ‘दृश्यम’ या चित्रपटात इशिताने अजय देवगणच्या मुलीची भूमिका साकारली होती. त्यामुळे अजय आपल्या पत्नीसोबत आवर्जुन इशिताच्या लग्नाला उपस्थित राहिला. वत्सल सेठबद्दल बोलायचे झाल्यास, सध्या तो ‘हासिल’ या मालिकेत बिझी आहे.

ALSO READ : ... आणि इशिता रडली

‘फिरंगी’ हा चित्रपट एका लहान गावातील मुलाची कथा आहे. जो एका एनआरआय मुलीच्या प्रेमात पडतो. या चित्रपटात इशिता दत्ता व मोनिका गिल या दोघी मुख्य भूमिकेत आहेत.

Web Title: See pics: Kapil Sharma's heroine Ishita Dutta gets stuck in marriage! 10 years old married actress !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.