SEE PICS : कठुआ व उन्नाव बलात्कार प्रकरण : गर्दीतील एक होऊन रस्त्यावर उतरले बॉलिवूड सेलिब्रिटी!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2018 05:01 AM2018-04-16T05:01:58+5:302018-04-16T10:31:58+5:30
संपूर्ण देशाला हादरवून कठुआ व उन्नाव बलात्कार प्रकरणांविरोधात सगळीकडे क्षोभ आहे. सोशल मीडियापासून गल्लीबोळापर्यंत या घटनांचा निषेध होत आहे. ...
स पूर्ण देशाला हादरवून कठुआ व उन्नाव बलात्कार प्रकरणांविरोधात सगळीकडे क्षोभ आहे. सोशल मीडियापासून गल्लीबोळापर्यंत या घटनांचा निषेध होत आहे. रविवारी मुंबईतील जनता या प्रकरणांतील बलात्कार पीडितांना न्याय देण्याच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरली. या गर्दीत बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटीही हिरहिरीने सहभागी झालेत. बलात्कार पीडितांना न्याय आणि आरोपींना कठोरातील कठोर शिक्षेची मागणी करत, मुंबईकर वांद्रे भागात एकवटले. खरे तर बॉलिवूड सेलिब्रिटी सर्वसामान्य जनतेत सहजा मिसळत नाहीत. पण उन्नाव व कठुआ बलात्कार प्रकरणाविरोधात रस्त्यावर उतरताना बॉलिवूड सेलिब्रिटी सर्वसामान्यांच्या गर्दीतील एक झालेत.
या आंदोलनात अक्षय कुमारची पत्नी व अभिनेत्री ट्विंकल खन्ना मुलगा आरव याच्यासोबत सहभागी झाली. गर्दीतील एक होऊन ट्विंकलने कथुआ व उन्नाव घटनांचा निषेध नोंदवला.
आमिर खानची पत्नी किरण राव, सलमान खानची आई हेलेन, अभिनेता राजकुमार राव, त्याची प्रेयसी व अभिनेत्री पत्रलेखा, अदिती राव हैदरी, सोना महोपात्रा, कल्की कोच्लिन, संगीतकार विशाल डडलानी आदी सेलिब्रिटींनी या घटनेचा निषेध नोंदवला. विशाल डडलानी याने बलात्काºयांना त्वरित फासावर चढवण्याची मागणी केली.
सोशल मीडियावरही अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी कठुआ व उन्नाव बलात्कार प्रकरणाचा निषेध नोंदवत, पीडितांना न्याय देण्याची मागणी केलीय. रेणुका शहाणे, सोनम कपूर, रिचा चड्ढा, गुल पनाग, करिना कपूर, स्वरा भास्कर,अभिनेता रणदीप हुड्डा यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून या घटनांविरोधात आवाज उठवला.
हो मी हिंदुस्तान आहे आणि आज मलाही लाज वाटतेय, अशी पोस्टर या सेलिब्रिटींनी झळकवली. केवळ बॉलिवूड सेलिब्रिटीचं नाहीत, तर कथुआ व उन्नाव प्रकरणावरून राजकीय नेते, क्रीडापटू, कलावंत अशा समाजातील विविध क्षेत्रांतून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. अशा प्रकारचे कृत्य करणाºया दोषींना फासावा चढवले जायला हवे,दोषींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे, असे मत व्यक्त होत आहे.
ALSO READ : Kathua Rape Case : बॉलिवूडमध्ये तीव्र संताप; म्हटले, ‘अखेर देव कुठे आहे?’