See Pics : मस्तानी दीपिका पादुकोण ‘मुड मुड के’ कोणाला बरं बघत असेल?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2017 01:45 PM2017-08-12T13:45:27+5:302017-08-12T19:15:27+5:30

बॉलिवूडची मस्तानी आणि आघाडीची अभिनेत्री असलेली दीपिका पादुकोण सध्या तिच्या आगामी चित्रपटांच्या शूटिंगमध्ये प्रचंड व्यस्त आहे. त्यासाठी तिला सातत्याने ...

See Pics: Mastani Deepika Padukone looking at 'Mud Mud Ke'? | See Pics : मस्तानी दीपिका पादुकोण ‘मुड मुड के’ कोणाला बरं बघत असेल?

See Pics : मस्तानी दीपिका पादुकोण ‘मुड मुड के’ कोणाला बरं बघत असेल?

googlenewsNext
लिवूडची मस्तानी आणि आघाडीची अभिनेत्री असलेली दीपिका पादुकोण सध्या तिच्या आगामी चित्रपटांच्या शूटिंगमध्ये प्रचंड व्यस्त आहे. त्यासाठी तिला सातत्याने विदेशात जावे लागत आहे. बºयाच कालावधीनंतर मस्तानी दीपिका मुंबई विमानतळावर स्पॉट झाली. संपूर्ण ब्लॅक कलरच्या ड्रेसमध्ये असलेली दीपिका एखाद्या ब्लॅक ब्यूटिसारखी दिसत होती. मात्र तिच्याकडे कॅमेरे वळताच तिने लाजत चेहरा लपविण्याचा प्रयत्न केला. नेहमीच कॅमेºयांना बिनधास्तपणे सामोरे जाणारी दीपिका यावेळेस मात्र चेहरा लपविताना दिसली. 



खरं तर दीपिकाचा जेव्हा-जेव्हा फोटो काढण्याचा प्रयत्न केला जात होता, तेव्हा-तेव्हा ती मागे वळून बघत होती. गालावर किंचितशी स्माइल अन् त्यामुळे पडलेली खळी दीपिकाचे सौंदर्य अधिकच खुलवत होते. परंतु दीपिका ‘मुड मुड के’ कोणास बघत होती? याचा मात्र अखेरपर्यंत उलगडा होऊ शकला नाही. वास्तविक दीपिकाची ही कृती बरेच प्रश्न उपस्थित करणारी होती. कारण ज्यापद्धतीने ती मागे बघत होती, त्यावरून ती नक्कीच काहीतरी मीडियापासून लपविण्याचा प्रयत्न करीत असावी असे दिसत होते. 



दीपिका सध्या संजय लीला भन्साळीच्या आगामी ‘पद्मावती’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. चित्रपटात ती राणी पद्मावतीची भूमिका साकारताना बघावयास मिळेल. दीपिका व्यतिरिक्त तिचा कथित बॉयफ्रेंड रणवीर सिंंग आणि शाहिद कपूर यांच्याही या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. त्याचबरोबर दीपिका ‘माजिद माजिदी’मध्येही दमदार भूमिका साकारताना बघावयास मिळणार आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटातील तिचा लूक सोशल मीडियावर लीक झाला होता. लीक झालेल्या फोटोमध्ये दीपिका अतिशय सामान्य परिवारातील मुलीच्या भूमिकेत असल्याचे दिसत होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन हनी त्रेहन करीत आहेत. 



दरम्यान, दीपिका तिच्या प्रोफेशनल लाइफबरोबरच रणवीर सिंगबरोबरच्या अफेअरमुळेही चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच दोघांमध्ये ब्रेकअप झाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. मात्र अद्यापपर्यंत असे कुठलेही संकेत दिसले नसल्याने त्यांचे खरोखरच ब्रेकअप झाला का, याविषयी मात्र शंका निर्माण केली जात आहे. 

Web Title: See Pics: Mastani Deepika Padukone looking at 'Mud Mud Ke'?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.