SEE PICS : ‘मुन्ना मायकल’ ‘दर्दी’ नागपूरच्या प्रेमात!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2017 06:19 AM2017-07-13T06:19:46+5:302017-07-13T11:49:46+5:30
लाखो तरुणांच्या गळ्यातील ताईत आणि तरुणींची ‘दिल की धडकन’ असलेला अभिनेता टायगर श्रॉफ आणि अभिनेत्री निधी अग्रवाल यांच्या ‘झुमके’ ...
ल खो तरुणांच्या गळ्यातील ताईत आणि तरुणींची ‘दिल की धडकन’ असलेला अभिनेता टायगर श्रॉफ आणि अभिनेत्री निधी अग्रवाल यांच्या ‘झुमके’ स्टाईलने नागपूरकरांना अगदी बेभान केले. जगप्रसिद्ध पॉपस्टार मायकल जॅक्सनच्या स्मृतिदिनानिमित्त आणि ‘मुन्ना मायकल’ या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी टायगर व निधी तसेच सुप्रसिद्ध गायक सिद्धार्थ महादेवन बुधवारी नागपुरात आलेत. ‘लोकमत’ व ‘प्रीती आयआयटी पिनॅकल’तर्फे हा कार्यक्रम आयोजित केला गेला होता.
टायगर व निधी स्टारर ‘मुन्ना मायकल’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे.याच‘मुन्ना मायकल’च्या ‘एक्झॉटिक लव्ह साँग’वर टायगर व निधी या दोघांनी धम्माल डान्स करत नागपूरकरांना आपल्या तालावर नाचवले. ‘दिल हैं आवारा तो ऐतराज क्यो हैं...’ या पहिल्याच गाण्यावर टायगर व निधी असे काही थिरकलेत की, अख्खे स्टेडियम नाचायला लागले. यानंतर ‘मेरी वाली डिंग, डांग, डिंग, डांग, डिंग, डांग, डिंग, डांग, करती हैं...’ या गाण्यावरच्या टायगरच्या डान्सने तर अख्खे स्टेडिअम बेभान झाले. मोबाईल फ्लॅशचा झगमगाट, फ्लॅश मॉब जल्लोष अशा सगळ्या धम्माल वातावरणात तरूणाई अगदी ‘बेपर्वा’ होत नाचली.
नागपुरच्या ‘दर्दी’ गर्दीसोबतचा सेल्फी
प्रेक्षकांनी खचाखच भरलेले स्टेडिअम पाहून टायगर श्रॉफ व निधी अग्रवाल या दोघांना या ‘दर्दी’ गर्दीसोबत सेल्फी काढण्याचा मोह आवरता आला नाही. सिद्धार्थ महादेवनही मग त्यांच्यात सामील झाला. या तिघांनी नागपुरकरांसोबत झक्कासपैकी सेल्फी घेतला.
‘लोकमत’चे मानले आभार
ALSO READ : टायगर श्रॉफच्या ठेक्यावर थिरकली नागपूरची तरूणाई!
मी जगभरात फिरलोय. पण नागपूरसारखे दर्दी चाहते पाहिले नाहीत. हजारो प्रेक्षकांच्या साक्षीने मी आज बोलतोय. मी आज याठिकाणी तुमच्याशी संवाद साधतोय, याचे संपूर्ण श्रेय ‘लोकमत’चे आहे. यासाठी मी सर्वप्रथम ‘लोकमत’चे आभार मानेल, असे टायगर श्रॉफ म्हणाला.
‘मुन्ना मायकल’ हा निधी अग्रवालचा पहिला चित्रपट. या पहिल्याच चित्रपटाचा अनुभव निधीने नागपूरकरांशी शेअर केला. पहिल्याच चित्रपटात मला टायगर आणि नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत काम करण्याची संधी मिळाली, हे माझे भाग्य आहे. टायगरने मला बरीच मदत केली. मी डान्स शिकले आहे. पण तरिही त्याच्यासोबत डान्स करताना मी प्रचंड नर्व्हस होते. पण त्याने मला माझे नवखेपण विसरायला भाग पाडले. त्याच्यासोबत काम करण्याचा अनुभव धम्माल होता, असे निधी म्हणाली.
हा अवघड प्रश्न
सिद्धार्थ महादेवन याने ‘दिल हैं आवारा तो ऐतराज क्यो हैं...’ हे सादर करत, प्रेक्षकांची मने जिंकलीत. यानंतर सिद्धार्थची छोटेखानी मुलाखतही रंगली. यावेळी एका प्रश्नाने सिद्धार्थची चांगलीच गोची केली. तू कंपोझर आहेस आणि गायकही. यापैकी सर्वांधिक तुला काय आवडतं? असा प्रश्न सिद्धार्थला केला गेला. यावर हा फार कठीण प्रश्न आहे. हे म्हणजे दोन मुलांमधून तुझा सर्वाधिक लाडका कोण? असे विचारण्यासारखे आहे, असे सिद्धार्थ म्हणाला.