SEE PICS : ‘दम लगाके हईशा’मधील सोज्वळ भूमी पेडणेकरचा हा हॉट अवतार बघून तुम्ही दंग व्हाल!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2017 04:51 PM2017-08-12T16:51:31+5:302017-08-12T22:21:31+5:30

‘दम लगाके हईशा’ या चित्रपटातील साधीभोळी आणि सोज्वळ दिसत असलेली भूमी पेडणेकर तुम्हाला आठवतेय काय? होय तीच भूमी! पण ...

SEE PICS: You will be stunned by watching this hot avatar of 'Same Lande Hisha'. | SEE PICS : ‘दम लगाके हईशा’मधील सोज्वळ भूमी पेडणेकरचा हा हॉट अवतार बघून तुम्ही दंग व्हाल!

SEE PICS : ‘दम लगाके हईशा’मधील सोज्वळ भूमी पेडणेकरचा हा हॉट अवतार बघून तुम्ही दंग व्हाल!

googlenewsNext
म लगाके हईशा’ या चित्रपटातील साधीभोळी आणि सोज्वळ दिसत असलेली भूमी पेडणेकर तुम्हाला आठवतेय काय? होय तीच भूमी! पण आता जर तुम्ही भूमीचा लूक बघाल तर तुमचा गोंधळ झाल्याशिवाय राहणार नाही. नुकत्याच रिलीज झालेल्या ‘टॉयलेट : एक प्रेम कथा’ या चित्रपटात बॉलिवूडचा खिलाडी अक्षयकुमारसोबत रोमान्स करणारी भूमी खूपच स्टायलिश झाली आहे. त्याचबरोबर तिचा अंदाजही जबरदस्त हॉट झाला असून, त्याची झलक नुकतीच बघावयास मिळाली आहे. 









नुकतीच भूमी बांद्रा येथे स्पॉट झाली. भूमीचा अवतार थक्क करणारा होता. कारण ट्रांसपेरेंट ड्रेसमध्ये भूमी खूपच हॉट दिसत आहे. काळ्या रंगाचा ट्रांसपेरेंट टॉप आणि ब्ल्यू रंगाची रिप्ड सीन्समध्ये भूमीला बघितल्यानंतर हीच काय ती ‘दम लगाके हईशा’मधील अभिनेत्री? असा प्रश्न पडल्याशिवाय राहणार नाही. भूमीचा हा अवतार तिच्या चाहत्यांना मात्र काही काळ बुचकळ्यात टाकणारा ठरेल, यात शंका नाही. 









दरम्यान, भूमीच्या ‘टॉयलेट : एक प्रेम कथा’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याने ती खूश आहे. पहिल्याच दिवशी चित्रपटाने १३.२० कोटी रुपयांचा बॉक्स आॅफिसवर गल्ला जमविला आहे. या चित्रपटाव्यतिरिक्त भूमी आयुष्यमान खुराणा याच्याबरोबर ‘शुभमंगल सावधान’मध्ये काम करीत आहे. दरम्यान, भूमीचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, तिचा हा नवा लूक थक्क करणारा आहे. तिच्या चाहत्यांना तर भूमीला अशा लूकमध्ये बघणे धक्का देणारे ठरत आहे.  

Web Title: SEE PICS: You will be stunned by watching this hot avatar of 'Same Lande Hisha'.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.