SEE UNSEEN PICS : ट्रॅजेडी किंग दिलीपकुमार यांचे ‘हे’ फोटो तुम्ही पाहिलेत काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2017 10:47 AM2017-08-06T10:47:14+5:302017-08-06T16:25:21+5:30
बॉलिवूडचे ट्रॅजेडी किंग आणि खºया अर्थाने शहंशाह असलेले दिलीपकुमार गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील लीलावती रुग्णालयात प्रकृती अस्वास्थ्यामुळे दाखल आहेत. ...
ब लिवूडचे ट्रॅजेडी किंग आणि खºया अर्थाने शहंशाह असलेले दिलीपकुमार गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील लीलावती रुग्णालयात प्रकृती अस्वास्थ्यामुळे दाखल आहेत. गेल्या बुधवारी त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. त्यांची प्रकृती सातत्याने बिघडत होती, मात्र शनिवारचा दिवस त्यांच्या कुटुंबीयांसह त्यांच्या चाहत्यांसाठी आनंददायी ठरला. दिलीपकुमार यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे डॉक्टरांनी सांगगितले. खरं तर त्यांना रुग्णालयात दाखल केल्याच्या दिवसापासूनच चाहत्यांकडून त्यांच्या स्वास्थ्यासाठी प्रार्थना केली जात आहे; विशेष म्हणजे चाहत्यांच्या प्रार्थनेला यशही येत आहे. असो, आज आम्ही बॉलिवूडच्या या शहंशाच्या काही दुर्मिळ फोटोंमधून त्यांचा बॉलिवूड प्रवास सांगणार आहोत. हे फोटो बघून दिलीपकुमार यांचा यशस्वी प्रवास अन् बॉलिवूडमधील त्यांचा रुबाब तुमच्या लगेचच लक्षात येईल.
महानायक अमिताभ बच्चन आणि सुपरस्टार दिलीपकुमार.
गानकोकिळा लता मंगेशकर आणि दिलीपकुमार.
देवआनंद यांच्यासोबतचे दिलीपकुमारचे हे छायाचित्र.
देवआनंदसोबतचा दिलीपकुमार यांचा हा फोटो ५० वर्षांपूर्वीचा आहे.
तब्बल पाच दशक बॉलिवूडवर एकहाती सत्ता गाजविणारे दिलीपकुमार १९९८ नंतर चित्रपटांमध्ये बघावयास मिळाले नाहीत. ‘किल्ला’ या त्यांच्या अखेरच्या चित्रपटात त्यांचा दमदार अभिनय बघावयास मिळाला. मात्र अशातही बॉलिवूडमधील त्यांचा रुबाब आणि स्टारडम आजही कायम आहे. दिलीपकुमार यांच्या फोटोंमध्ये दिसत असलेले बॉलिवूडचे इतर स्टार्स बघून तुमच्या लक्षात येईल की, प्रत्येकजण त्यांचा चाहता आहे.
तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यासोबत राज कपूर, दिलीपकुमार आणि देवआनंद.
साउथ सुपरस्टार एमजीआर-एनटीआरसोबत दिलीपकुमार.
क्रिकेटच्या मैदानावर राज कपूर यांच्यासोबत दिलीपकुमार.
मस्तीच्या मूडमध्ये दिसत असलेले दिलीपकुमार, देवआनंद आणि इतर स्टार.
दिलीपकुमार हे फिल्मफेअर पुरस्कार मिळविणारे पहिले अभिनेता आहेत. विशेष म्हणजे त्यांनी हा पुरस्कार एकदा-दोनदा नव्हे तर तब्बल आठ वेळा आपल्या नावे केला आहे. त्यामुळे त्यांचे नावे हे एक रेकॉर्डच आहे. दिलीपकुमार यांचा विशिष्ट शैलीचा अभिनयच त्यांना महान कलाकार बनवितो. चित्रपटातील त्यांचा वावर अन् अभिनय बघून कोणी त्यांच्या प्रेमात पडणार नाही, असे म्हणणे घाईचेच ठरेल. कारण दमदार अभिनयाच्या जोरावर त्यांनी सुपरस्टारचा दर्जा मिळविला. अभिनय हेच त्यांच्या यशाचे गमक राहिले आहे.
दिलीपकुमार आणि राज कपूर यांचा एक क्युट फोटो
दिलीपकुमार यांचा सामाजिक बांधिलकी दाखविणारे छायाचित्र.
दिलीपकुमार यांच्या इतर सुपरस्टार्सबरोबरची बॉन्डिग बघण्यासारखी होती, या फोटोवरून ते दिसून येते.
दिलीपकुमार आणि शायरा बानू यांच्या लग्नाचा एक फोटो.
त्यांनी ‘देवदास’, ‘शक्ती’, ‘राम और श्याम’, ‘लीडर’, ‘कोहिनूर’, ‘नया दौर’, ‘आजाद’, ‘दाग’, ‘क्रांती’, ‘मुघले-ए-आझम’ यांसारख्या दर्जेदार चित्रपटांमध्ये भूमिका साकारून त्या भूमिका अजरामर केल्या. दिलीपकुमार यांचा हा प्रवास थक्क करणारा असून, त्यांचे स्टारडम अधोरेखित करणारा आहे.