SEE VIDEO : झोपडपट्टीतील एका चिमुकल्याबरोबर रमला सलमान खान; पहा व्हिडीओ!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2017 01:52 PM2017-08-03T13:52:32+5:302017-08-03T19:49:35+5:30

​सलमान खानला लहान मुलांचा किती लळा आहे, हे जर कोणाला जाणून घ्यायचे असेल तर त्यांनी हा व्हिडीओ नक्की बघावा.

SEE VIDEO: Ramla Salman Khan with a Chimukula in Slums; Watch video! | SEE VIDEO : झोपडपट्टीतील एका चिमुकल्याबरोबर रमला सलमान खान; पहा व्हिडीओ!

SEE VIDEO : झोपडपट्टीतील एका चिमुकल्याबरोबर रमला सलमान खान; पहा व्हिडीओ!

googlenewsNext
मान खानला लहान मुलांचा किती लळा आहे, हे जर कोणाला जाणून घ्यायचे असेल तर त्यांनी हा व्हिडीओ नक्की बघावा. सलमान अजूनही अविवाहित आहे. परंतु मुलांप्रती त्याचे प्रेम कधीच लपून राहिले नाही. चित्रपट असो वा रिअल लाइफ सलमानला लहान मुले दिसताच त्यांच्या वयाचा होतो. त्यामुळेच तो त्याच्या ‘बीर्इंग ह्युमन’ या संस्थेच्या माध्यमातून गरजू मुलांच्या उपचारासाठी आणि शिक्षणासाठी सढळ हाताने मदत करीत असतो. असो, सलमानचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये सलमान झोपडपट्टी परिसरात राहणाºया एका लहानग्याशी खेळताना दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात शेअर केला जात असून, चाहत्यांकडून त्यास जबरदस्त पसंती दिली जात आहे. 

सलमानचा हा व्हिडीओ salmankhanteamturkey ने शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये सलमान झोपडपट्टी परिसरातून जाताना दिसत आहे. त्याच्या मागे प्रचंड गर्दी आहे. लोक त्याला बघण्यासाठी दुतर्फा गर्दी करीत आहेत. काही अंतरावर आल्यानंतर दरवाजात उभ्या असलेल्या एका महिलेच्या कडेवरील एका गोंडस चिमुकल्याकडे सलमानची नजर जाते. मग काय, भाईजान त्या महिलेकडे जात त्या चिमुकल्यासोबत खेळण्यात असा काही दंग होतो की, गर्दीमधील मोबाइल कॅमेरे काही क्षणातच त्याच्या दिशेने वळतात. सलमान त्या चिमुकल्याच्या डोक्यावरून हात फिरवित त्याचे लाड करतो. प्रेमाने त्याच्याशी चार शब्द बोलतो. तसेच त्या महिलेचीदेखील विचारपूस करतो. सलमानचे हे रूप उपस्थिताना एवढे भावते की, एवढा मोठा सुपरस्टार एका झोपडपट्टीतील मुलाबरोबर खेळतो, त्याच्या आईची विचारपूस करतो, अशी लगेचच चर्चाही रंगायला लागते. 
 

खरं तर सलमानला लहान मुलांप्रती नेहमीच लळा राहिला आहे. शिवाय लोकांची मनं जिंकण्याची त्याच्यात असलेली कला आज त्याला सुपरस्टारचा दर्जा मिळवून देते. खरं तर सलमानने आपल्या कृतीतून लोकांची मनं जिंकल्याची घटना पहिल्यांदाच घडली असे नाही. तर यापूर्वी २ मार्च २०१६ रोजी जेव्हा सलमान त्याच्या परिवारासोबत मुंबईतील एका हॉटेलमध्ये फॅमिली डिनरसाठी आला होता, तेव्हाही काहीसे असेच घडले होते. सलमान हॉटेलमध्ये आल्याची बातमी समजताच त्याच्या चाहत्यांनी हॉटेलबाहेर गर्दी केली. यामध्ये काही झोपडपट्टी परिसरातील मुलांचाही समावेश होता. जेव्हा सलमान हॉटेलबाहेर आला तेव्हा तो रिकाम्या हाताने आला नव्हता. त्याने काही रंगीबेरंगी पुस्तके आणली होती. उपस्थित मुलांना पुस्तके आणि काही पैसे देऊन तेथून निघून गेला. सलमानचा हा दिलदारपणा तेव्हा चांगलाच चर्चेचा विषय ठरला होता. 

असो, सध्या सलमान त्याच्या आगामी ‘टायगर जिंदा हैं’ या चित्रपटाची शूटिंग पूर्ण करून मोरक्को येथून भारतात परतला आहे. चित्रपटात तो अभिनेत्री कॅटरिना कैफ हिच्यासोबत बघावयास मिळणार आहे. सध्या तो ‘बिग बॉस’ या शोच्या प्रोमो शूटमध्ये व्यस्त आहे. याही वर्षी सलमान या शोला होस्ट करताना बघावयास मिळणार आहे. बिग बॉसचा प्रोमो शूट झाल्यानंतर तो पुन्हा त्याच्या ‘टायगर जिंदा हैं’च्या शूटिंगमध्ये व्यस्त होणार आहे. सध्या या चित्रपटाचा ‘क्लायमॅक्स’ शूट करण्याचे काम सुरू आहे. याकरिता सलमान लवकरच अबूधाबी येथे रवाना होणार आहे. 

Web Title: SEE VIDEO: Ramla Salman Khan with a Chimukula in Slums; Watch video!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.