See Video : ...तर यामुळे सोनम कपूरला म्हणतात ‘जिराफ’!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2018 11:00 AM2018-03-20T11:00:25+5:302018-03-20T16:30:25+5:30

बॉलिवूड सुपरस्टार्सचे निकनेम खूप मजेशीर असतात. यामध्ये सोनम कपूरचाही समावेश असून, ‘जिराफ’ हे तिचे निकनेम आहे, पण तिला जिराफ नावाने का बोलवितात? जाणून घ्या!

See Video: ... So Sonam Kapoor says 'Giraffe'! | See Video : ...तर यामुळे सोनम कपूरला म्हणतात ‘जिराफ’!

See Video : ...तर यामुळे सोनम कपूरला म्हणतात ‘जिराफ’!

googlenewsNext
लिवूड सेलिब्रिटी आपल्या निकनेमवरूनही नेहमीच चर्चेत असतात. हृतिक रोशनला ‘डग्गू’, तर प्रियंका चोपडाला ‘मिमी’ या निकनेमने घरी बोलावितात. २००७ मध्ये ‘सावंरिया’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणारी अभिनेत्री सोनम कपूर हिलादेखील अशाच काहीशा मजेशीर निकनेमने बोलाविले जाते.  सोनमचे वडील अनिल कपूर तिला जिराफ या नावाने बोलावितात. सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका व्हिडीओमध्ये स्वत: सोनमनेच याबाबतचा खुलासा केला आहे. व्हिडीओमध्ये सोनमने स्वत:च्या निकनेमबद्दल सांगतानाच बहीण रिया कपूरला कुठल्या निकनेमने संबोधतात याचाही खुलासा केला आहे. 

बिजनेस आॅफ सिनेमा नावाच्या एका यू-ट्यूब चॅनेलने याबाबतचा एक व्हिडीओ अपलोड केला आहे. व्हिडीओमध्ये सोनमला विचारण्यात येते की, तुझे निकनेम काय? किंवा तुला घरातील इतर मंडळी कुठल्या नावाने चिडवतात? या प्रश्नांचे उत्तर देतांना सोनमने म्हणते की, पापा मला ‘जिराफ’ या नावाने बोलावितात. कारण माझी मान लांब आहे, तर फॅमिली आणि मित्रपरिवार मला ‘सीनियर’ या नावाने बोलावितात. या व्हिडीओमध्ये सोनमसोबत तिची लहान बहीण रिया कपूरही बघावयास मिळत आहे. रिया म्हणते की, ‘माझे मित्र मला ‘रिरि’ नावाने बोलावितात. तर बोनी काका ‘छिपकली’ म्हणतात. कारण लहानपणापासून मी खूप सडपातळ आहे. जेव्हा घरातील मंडळी मला ‘छिपकली’ नावाने बोलावितात तेव्हा मला खूप चांगले वाटते’ असेही रिया सांगताना दिसते. 



दरम्यान, सोनमने ‘दिल्ली-६’, ‘आय हेट लव स्टोरी’, ‘आयशा’, ‘मौसम’, ‘रांझणा’, ‘डॉली की डोली’, ‘प्रेम रतन धन पायो’, ‘नीरजा’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. काही काळापूर्वीच प्रदर्शित झालेल्या सोनमच्या ‘पॅडमॅन’ला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. या चित्रपटात ती अक्षयकुमार आणि राधिका आपटेसोबत बघावयास मिळाली. सध्या सोनम तिच्या आगामी ‘द झोया फॅक्टर’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. चित्रपटात सोनमसोबत साउथ स्टार दलकेर सलमान बघावयास मिळणार आहे. चित्रपट अनुजा चौहानच्या ‘द झोया फॅक्टर’ या पुस्तकावर आधारित आहे. हा चित्रपट ५ एप्रिल २०१९ मध्ये प्रदर्शित होणार आहे. 

Web Title: See Video: ... So Sonam Kapoor says 'Giraffe'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.