सोनम कपूरच्या रिसेप्शनचा लेहेंगा पाहून युझर्सने म्हटले हा तर आमच्या घराचा पडदा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2018 07:09 AM2018-05-11T07:09:11+5:302018-05-11T12:39:11+5:30
सोनम कपूरच्या लग्नाची चर्चा सध्या चांगलीच रंगली आहे. सोनम कपूरने नुकतेच मुंबईत तिचा प्रियकर आनंद आहुजासोबत लग्न केले. सोनम ...
स नम कपूरच्या लग्नाची चर्चा सध्या चांगलीच रंगली आहे. सोनम कपूरने नुकतेच मुंबईत तिचा प्रियकर आनंद आहुजासोबत लग्न केले. सोनम आणि आनंदचे लग्न सोनमची जवळची नातेवाईक आणि इंटेरियर डिझायनर कविता सिंग यांच्या बॅण्डस्टॅण्डस्थित आलिशान बंगल्यात पार पडला तर त्यांचे रिसेप्शन मुबंई येथील लीला हॉटेलमध्ये झाले. सोनमच्या लग्नाला आणि रिसेप्शनला बॉलिवूडमधील अनेकांनी हजेरी लावली. अमिताभ बच्चन, सलमान खान, शाहरुख खान, आमिर खान, रेखा यांसारख्या बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटींनी सोनमच्या लग्नाला आवर्जून उपस्थिती लावली.
सोनमला बॉलिवूडमधील स्टाइल आयकॉन म्हटले जाते. त्यामुळे तिने तिच्या मेहंदी, संगीत सेरमनी, लग्न, रिसेप्शन यांना काय कपडे घातले याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली होती. लग्नातील तिच्या आकर्षक लेहंग्यामुळे तिचे सौंदर्य आणखी खुलून गेले होते. लग्नात सोनमने परिधान केलेल्या लेहंग्याची किंमत चांगलीच होती. तिच्या लग्नातील हा लेहेंगा प्रेक्षकांना चांगलाच आवडला होता. पण रिसेप्शनमध्ये तिने घातलेल्या लेहेंग्यावरून सोशल मीडियावर तिला चांगलेच ट्रोल करण्यात आले. तिचा लेहेंगा पाहून हा तर आमच्या घराचा पडदा आहे असे म्हणत नेटिझन्सनी काही पडद्याचे फोटो देखील सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
आनंद आणि सोनमच्या अफेअरची चर्चा २०१६ पासून आहे. मात्र सोनम आणि आनंदने कधीही त्यांच्यातील रिलेशनशिपविषयी जाहिरपणे सांगितले नाही. दोघीनीही नाते प्रायव्हेट ठेवले होते. मात्र त्यांच्यातल्या केमिस्ट्रीमुळे ते नेहमीच चर्चेत राहिले. आनंद देशातील सर्वात मोठ्या एक्सपोर्ट हाऊस म्हणजे शाही एक्सपोर्टचे मालक हरिष आहुजाचा यांचा मुलगा आहे. आनंद या कंपनीचा व्यवस्थापकीय संचालक आहे. हा त्याचा फॅमिली बिझनेस आहे.
लग्नामुळे गेल्या काही दिवसांमध्ये चर्चेत राहिलेली सोनम कपूर स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या चार्ट्सवर सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्री बनलेली आहे.विशेष म्हणजे, गेल्या तीन आठवड्यांपासून स्कोर ट्रेंड्सच्या लोकप्रियतेच्या चार्टवर नंबर वन स्थानी असलेल्या ग्लोबल स्टार प्रियंका चोप्राला या आठवड्यात सोनम कपूरने मागे टाकले आहे.
Also Read : सोनम कपूरच्या लग्नात स्टायलिश अंदाजात अवतरला छोटा नवाब