बॉलिवूडच्या ‘या’ हॉट आयटम गर्लने शेअर केला सेल्फ आयसोलेशन फोटो; चाहत्यांनी दिली फोटोला पसंती!!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2020 06:30 PM2020-04-26T18:30:57+5:302020-04-26T18:31:38+5:30
बॉलिवूडची एक हॉट आयटम बालाही यात मागे नाही. ती कोण? असा विचार करण्यापूर्वी आम्हीच तुम्हाला सांगू इच्छितो...
सध्या कोरोनामुळे सर्व सेलिब्रिटी हे आपापल्या घरात वेगवेगळया अॅक्टिव्हिटींमध्ये स्वत:ला बिझी ठेवत आहेत. लॉकडाऊनचे हे दिवस कधी एकदा संपतात असेही काहींना झाले आहे. त्यात ते चाहत्यांसोबत न चुकता सोशल मीडियावर वेगवेगळे व्हिडीओ, फोटोज शेअर करत असतात. बॉलिवूडची एक हॉट आयटम बालाही यात मागे नाही. ती कोण? असा विचार करण्यापूर्वी आम्हीच तुम्हाला सांगू इच्छितो की, ती अभिनेत्री म्हणजे मलायका अरोरा. ती इतर सेलिब्रेटींप्रमाणे सोशल मीडियावर बरीच सक्रिय आहे.
मलायका अरोरा नेहमीच तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. काही दिवसांपूर्वी मलायकाने नो मेकअप फोटो शेअर केला होता जो खूप व्हायरल झाला होता. आताही तिनं असाच एक फोटो शेअर केला जो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. खास करुन या फोटोचं कॅप्शन सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. मलायकानं नुकताच तिच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यात तिनं ब्लॅक आऊटफिट्स घातले असून या फोटोमध्येही तिचा नो मेकअप लूक पाहायला मिळत आहे. हा फोटो शेअर करताना तिनं लिहिलं, ‘हा आठवडा सुद्धा निघून गेला... मी विचार करतेय आम्हाला नक्की काय रोखत आहे. पण या गोष्टीचा आनंद आहे की, माझ्या त्वचेवर सूर्याचा प्रकाश, केसांमध्ये खेळणारी हवा, माझ्या डोक्यावर छत आहे आणि माझ्यावर प्रेम करणारी प्रत्येक व्यक्ती माझ्याजवळ आहे.’
मलायकाच्या या फोटोवर अनेकांना कमेंट केल्या आहेत. तिचा हा फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. तसं पाहायलं गेलं तर सोशल मीडियावर मलायकाचा एखादा फोटो व्हायरल होण्याची ही पहिलच वेळ नाही. याआधीही तिच्या बऱ्याच पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. याशिवाय ती अर्जुन कपूरसोबतच्या रिलेशनशिपमुळे खूप चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी एका लाइव्ह चॅटमध्ये अर्जुनला मलायकाशी लग्न करण्याच्या प्लानविषयी प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना, जर लग्न केलं तर आम्ही दोघंही कोणापासून लपवणार नाही. मात्र सध्या तरी लग्नाचा कोणताही विचार आम्ही केलेला नाही. सध्या आम्ही दोघंही आमच्या कामावर लक्ष देत आहोत असं अर्जुन म्हणाला होता.