ज्येष्ठ अभिनेते कादर खान यांची प्रकृती खालावल्याने व्हेंटिलेटरवर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2018 10:09 AM2018-12-28T10:09:13+5:302018-12-28T10:15:30+5:30

ज्येष्ठ अभिनेते कादर खान आपल्या मुला व सुनेसोबत गेल्या अनेक दिवसांपासून कॉनडात आहेत. अनेक दिवसांपासून ते आजारी आहे. मीडिया रिपोर्टनुसार कादर खान यांना  BiPAP व्हेंटिलेटर लावण्यात आले आहे.

Senior actor Kader Khan on ventilator | ज्येष्ठ अभिनेते कादर खान यांची प्रकृती खालावल्याने व्हेंटिलेटरवर

ज्येष्ठ अभिनेते कादर खान यांची प्रकृती खालावल्याने व्हेंटिलेटरवर

googlenewsNext
ठळक मुद्देडॉक्टरांची एक टीम सतत कादर खान यांच्यावर नजर ठेवून आहे त्यांना  BiPAP व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे

ज्येष्ठ अभिनेते कादर खान आपल्या मुला व सुनेसोबत गेल्या अनेक दिवसांपासून कॉनडात आहेत. अनेक दिवसांपासून ते आजारी आहे. मीडिया रिपोर्टनुसार कादर खान यांना  BiPAP व्हेंटिलेटर लावण्यात आले आहे. ही माहिती कादर खान यांचा मुलगा सरफराज खान यांने दिली आहे.  


डॉक्टरांची एक टीम सतत कादर खान यांच्यावर नजर ठेवून आहे. श्वास घ्यायला त्रास होऊ लागल्याने त्यांना  BiPAP व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. गेल्या वर्षी कादर खान यांच्या पायाचे ऑपरेशन करण्यात आले होते त्यानंतर त्यांची तब्येत  ढासळत असते. 


कादर खान यांच्या नावावर एकेकाळी चित्रपट चालत असत. पण असे असूनही त्यांनी उतारवयात खूपच कमी चित्रपटात काम केले. चित्रपटात काम कमी करण्यामागे एक खास कारण असल्याचे त्यांनी काही वर्षांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले होते. कादर खान यांनी २०१५ मध्ये हो गया दिमाग का दही या चित्रपटात काम केले होते.


कादर खान यांनी डाग या चित्रपटापासून त्यांच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांनी कुली, होशियार, हत्या यांसारख्या अनेक चित्रपटांचे लेखन केले. नव्वदीच्या तर अनेक चित्रपटांमध्ये आपल्याला त्यांना पाहायला मिळाले होते. त्यांनी चित्रपटाप्रमाणेच हाय पडोसी कौन है दोशी, हसना मत यांसारख्या मालिकांमध्ये काम केले. त्यांना त्यांच्या अभिनयासाठी आणि लिखाणासाठी आजवर अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

Web Title: Senior actor Kader Khan on ventilator

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.