सोहम शाह या चित्रपटाचा बनवणार सीक्वल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2018 17:02 IST2018-12-12T17:00:46+5:302018-12-12T17:02:18+5:30
सोहम शाहचा काही महिन्यांपूर्वी 'तुम्बाड' चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता.

सोहम शाह या चित्रपटाचा बनवणार सीक्वल
निर्माता व अभिनेता सोहम शाहचा 'तुम्बाड' चित्रपट काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा व समीक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. आता या सिनेमाचा सीक्वल बनणार असल्याचे समजते आहे.
'तुम्बाड' चित्रपटाचा निर्माता व अभिनेता सोहम शाहने तुम्बाड चित्रपटाचा सीक्वल बनवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्यानुसार बऱ्याच लोकांनी या चित्रपटाचा सीक्वल बनवावा, अशी सूचना केली. त्यांचे म्हणणे मनावर घेतले आणि सीक्वलसाठी आयडिया डेव्हलप केली. आता पटकथा लेखक भेटला की सोहम शाहच्या कल्पेनाला कथेचे रुप मिळेल. 'तुम्बाड २' चित्रपटाची कथा आधीच्या सिनेमापेक्षा वेगळी असणार आहे. मात्र चित्रपटाचा संबंध तुम्बाड या ठिकाणाशी असणार आहे. पहिल्या भागातील काही पात्र दुसऱ्या भागातही पाहायला मिळणार आहेत.
सोहम शाह म्हणाला की, ''तुम्बाड' चित्रपटात काम करत असताना विचार केला होता की या चित्रपटाचा दुसरा भाग नक्कीच बनवणार आहे. आता सोहम शाहकडे तर आयडियादेखील आहे. याशिवाय सोहम आणखीन एका चित्रपटाची तयारी करतो आहे. या चित्रपटात हलकाफुलका ड्रामा पाहायला मिळणार आहे.'
'तुम्बाड'ची कथा १९२० च्या काळातील आहे. पुण्यातील एका प्रतिष्ठित ब्राह्मण कुटुंबाच्या तीन पिढ्यांच्या अवती-भवती फिरणारी एक कथा यात आहे. सोहम शाहचा हा महत्त्वाकांक्षी चित्रपट सहा वर्षांपासून पाईपलाईनमध्ये होता. राही अनिल बर्वेने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटात सोहम शाहसोबत ज्योती माळसे, अनीता दाते, दीपक दामले अणि रंजिनी चक्रवर्ती मुख्य भूमिकेत आहेत.