चित्रपटात इंटिमेट सीन कसे शूट होतात ? 'सीरियल किसर' इमरान हाश्मीने सांगितली पडद्यामागची परिस्थिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2024 12:09 IST2024-07-16T11:58:31+5:302024-07-16T12:09:42+5:30
अभिनेता इमरान हाश्मी याला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही.

चित्रपटात इंटिमेट सीन कसे शूट होतात ? 'सीरियल किसर' इमरान हाश्मीने सांगितली पडद्यामागची परिस्थिती
अभिनेता इमरान हाश्मी याला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. 'मर्डर', 'जन्नत', 'आशिक बनाया आपने', 'राज ३', 'जहर', 'गँगस्टर : अ लव्ह स्टोरी' अशा सुपरहिट सिनेमांमध्ये अभिनेता इमरान हाशमीने काम केलं आहे. 'मर्डर' या सिनेमात इंटिमेट सीन देऊन इमरान हाशमी प्रसिद्धीझोतात आला होता. बॉलिवूडचा "सिरियल किसर" अशी त्याची ओळख बनली. नुकतंच एका मुलाखतीत अभिनेत्याने सिनेमात इंटिमेट सीन कसे शूट केले जातात, याविषयी खुलासा केला आहे.
इमरान हाश्मी नुकतंच 'द लल्लनटॉप'ला एक मुलाखत दिली. या मुलाखतीत इमरान हाश्मीने सांगितले की, 'चित्रपटातील इंटिमेट सीन्स हे तांत्रिकदृष्ट्या शूट करण्यात येतात. अशा सीन्सच्या शूटिंग वेळी फार कमी लोक सेटवर असतात आणि यात टेक्निकचा वापर केला जातो. लिपलॉक सीन्स हे कधीकधी ओरिजनल शूट केले जातात. तर कधी-कधी वेगवेगळे शूट केले जाते. वेगवेगळे शूट झालेले सीन्स तंत्रज्ञानाच्या मदतीने एकत्र केले जातात. अशा सीन्सची शूटिंग खरंच असल्याचे बहुतांशी प्रेक्षकांना वाटते. लिपलॉक सीन्सच्या शूटिंगसाठी बऱ्याच अभिनेत्री उत्सुक नसतात आणि अभिनेतेही अशा शूटच्या वेळी कम्फर्ट नसतात'.
इमरान हाश्मीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर अलिकडेच त्याची 'शोटाईम' ही वेबसीरिज डिस्ने प्लस हॉटस्टार प्रदर्शित झाली. या सीरीजला प्रेक्षकांचं प्रेम मिळालं. नसीरुद्दीन शाह, इमरान हाश्मी, मौनी रॉय, श्रिया सरन अशी तगडी स्टारकास्ट या सीरिजमध्ये आहे. शिवाय तो अलिकडेच सारा अली खानच्या 'ए वतन मेरे वतन' या चित्रपटात झळकला होता. गेल्या वर्षी हा अभिनेता सलमान खानच्या 'टायगर 3' या चित्रपटात दिसला होता.त्याने आयएसआय एजंट आतिश फतेह कादरीची भूमिका साकारली होती. तसेच तो ‘सेल्फी’ चित्रपटात खिलाडी अक्षय कुमारबरोबर स्क्रीन शेअर करताना दिसला होता.