चक्रीवादळामुळं उडून गेला सेट, भाईजानला बसला कोट्यावधींचा फटका
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2021 11:06 AM2021-05-20T11:06:27+5:302021-05-20T11:08:21+5:30
तौक्ते चक्रीवादळामुळे त्याच्या चित्रपटाचा संपूर्ण सेटच उडून गेला. परिणामी चित्रपटाच्या निर्मितीपूर्वीच सलमानला कोट्यावधींचा फटका बसला आहे.
तौक्ते चक्रीवादळाचा केरळ, तामिळनाडू, गोवा, महाराष्ट्र आणि गुजराजमध्ये जोरदार तडाखा बसला. या वादळामुळं संपूर्ण वाहतुक व्यवस्था, वीजपुरवठा, अगदी लोकांची घरे, बागायतींचे देखील खूप मोठे नुकसान झाले. इतकंच नाही तर या चक्रीवादळाचा मोठा फटका सलमान खानला देखील बसला आहे. त्याचा आगामी सिनेमा टायगर ३ लवकरच रिलीज होणार होता. मात्र तौक्ते चक्रीवादळामुळे त्याच्या चित्रपटाचा संपूर्ण सेटच उडून गेला. परिणामी चित्रपटाच्या निर्मितीपूर्वीच सलमानला कोट्यावधींचा फटका बसला आहे.
सलमान खानचा सुपरहिट ठरलेला चित्रपट टायगर अभी जिंदा है या चित्रपटाचा सीक्वल टायगर ३ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. या सिनेमात सलमान सोबत कतरिना कैफ मुख्य भूमिकेत झळकणार आहे. कोरोनाच्या संकटामुळे या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलली जात आहे. शेवटी महाराष्ट्र सरकारकडून विशेष परवानगी मिळवून सलमान खानने मुंबईत सेट तयार करुन घेतला. मात्र नुकत्याच आलेल्या चक्रीवादळामुळे हा संपूर्ण सेट उडून गेला आहे. त्यामुळे भाईजानचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच सलमानच्या चाहत्यांना आता आणखी काही काळ या चित्रपटासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
सलमान खानचा बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित चित्रपट राधे योर मोस्ट वॉण्डेट भाई नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला. हा चित्रपट कोरोनाच्या संकटामुळे भारतात थिएटरमध्ये रिलीज झाला नाही. मात्र ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला.
‘राधे’ या सिनेमावर संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत. समीक्षकांना सिनेमा फार भावला नाही. पण सलमानच्या चाहत्यांनी मात्र सिनेमा डोक्यावर घेतला आहे. या चित्रपटात सलमान खानसोबत दिशा पटानी, जॅकी श्रॉफ, रणदीप हुडा हे कलाकार मुख्य भूमिकेत होते.