"सेक्स गरजेचं नाही...", सिनेमातील इंटिमेट सीन्सवर करीना कपूर स्पष्टच बोलली
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 10:23 IST2025-03-12T10:22:05+5:302025-03-12T10:23:26+5:30
Kareena Kapoor : एका मुलाखतीदरम्यान करीनाला चित्रपटांमध्ये दाखवल्या जाणाऱ्या सेक्स आणि इंटीमेट सीन्सबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर अभिनेत्री स्पष्टपणे बोलली आणि आपली प्रतिक्रिया देताना चित्रपटाच्या कथेनुसार हे किती महत्त्वाचे आहे किंवा नाही हे सांगितले.

"सेक्स गरजेचं नाही...", सिनेमातील इंटिमेट सीन्सवर करीना कपूर स्पष्टच बोलली
बॉलिवूडची बेबो म्हणजेच अभिनेत्री करीना कपूर (Kareena Kapoor). ती बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिच्या दमदार अभिनय आणि सौंदर्यांमुळे ती नेहमी चर्चेत येत असते. एवढेच नाही तर तिची स्पष्टवक्ते शैली देखील तिला वेगळी आणि खास बनवते. नुकतेच एका मुलाखतीदरम्यान करीनाला चित्रपटांमध्ये दाखवल्या जाणाऱ्या सेक्स आणि इंटीमेट सीन्सबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर अभिनेत्री स्पष्टपणे बोलली आणि आपली प्रतिक्रिया देताना चित्रपटाच्या कथेनुसार हे किती महत्त्वाचे आहे किंवा नाही हे सांगितले.
खरेतर करीना कपूर सेक्स एज्युकेशन वेब सीरिजसाठी द डर्टी मॅगझिनच्या मंचावर प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री गिलियन एंडरसनसोबतच्या इंटिमेट सीन्सबद्दल मोकळेपणाने बोलली. या मुलाखतीत गिलियनने करीनाला विचारले की, अशा सीनसाठी तू कोणती मर्यादा ठेवली आहेस. यावर करीना म्हणाली की, वैयक्तिकरित्या पाहिले तर चित्रपटाची कथा पुढे नेण्यासाठी हे (सेक्स सीन) फारसे महत्त्वाचे नाही. कथेच्या आधारे अशी दृश्ये दाखवण्याची गरज नसावी, असे मला वाटते. मला स्वत: स्क्रीनवर असे सीन करणे अजिबात कंफर्टेबल वाटत नाही. ते स्क्रीनवर दाखवण्यापूर्वी, तुम्ही स्वतःचा विचार केला पाहिजे आणि आदरपूर्वक पाहिले पाहिजे.
इंटिमेट सीन्सबद्दल अभिनेत्री म्हणाली...
अशाप्रकारे, करीना कपूरने स्पष्ट केले आहे की, ती चित्रपटांमध्ये कामुक दृश्ये दाखवण्याच्या किंवा शूट करण्याच्या फेव्हरमध्ये अजिबात नाही. चमेली आणि तलाश यांसारख्या सिनेमांमध्ये करीनाने स्वत: सेक्स वर्करची भूमिका साकारली आहे. इतकंच नाही तर ओंकारा आणि कुर्बान सारख्या चित्रपटातही तिचे इंटीमेट सीन पाहायला मिळाले आहेत.
या चित्रपटात दिसणार करीना कपूर
करीना कपूर मागील वर्षी अजय देवगणच्या सिंघम अगेनमध्ये दिसली होती. मात्र, यावर्षी तिचा 'दायरा' हा चित्रपट प्रदर्शित होऊ शकतो, ज्याचे दिग्दर्शन 'राझी' सारखे उत्तम चित्रपट बनवणाऱ्या मेघना गुलजार करत आहेत. या सिनेमात करीना पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे.