सावळ्या रंगामुळे लोक हिणवायचे, तरीही ग्लॅमर इंडस्ट्रीत निर्माण केली स्वतःची ओळख, डस्की ब्युटी म्हणून आहे प्रसिद्ध
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2020 11:08 AM2020-06-27T11:08:16+5:302020-06-27T11:08:42+5:30
गेल्या काही वर्षापासून बिपाशानं कोणताही सिनेमा केलेला नाही. पण सोशल मीडियावर मात्र ती सतत सक्रिय असते. तिचे सोशल मीडियावरील फोटो अनेकदा चर्चेचा विषय ठरतात.
बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बासू मागचा बराच काळ बॉलिवूडपासून दूर आहे. गेल्या काही वर्षापासून बिपाशानं कोणताही सिनेमा केलेला नाही. पण सोशल मीडियावर मात्र ती सतत सक्रिय असते. तिचे सोशल मीडियावरील फोटो अनेकदा चर्चेचा विषय ठरतात.
पुन्हा एकदा ती चर्चेत आली आहे. फेअरनेस क्रीम ‘फेअर अँड लव्हली’मधून फेअर हा शब्द वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.या निर्णयाचे सा-यांनीच स्वागत केले आहे. अनेक बॉलिवूड अभिनेत्रींनी यावर सोशल मीडियावर आपला आनंद व्यक्त करत त्यांना सावळ्या रंगामुळे कशाप्रकारे वर्णभेदाला सामोरे जावे लागले याबाबतचा खुलासा केला आहे.
यात बिपाशानेही सावळ्या रंगामुळे हिणवल्याचं तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहित सांगितलं आहे. लहानपणापासूनच तिला गोरी आणि सावळी यावरून नातेवाईकचं चर्चा करायचे असे तिने सांगितले. सुपरमॉडेल स्पर्धा जिंकल्यानंतरही वर्तमानपत्रांमध्ये सावळ्या रंगाची मुलगी ठरली विजेती अशा हेडिंग यायच्या. सावळा रंग हे मला वर्णन करण्यासाठी विशेषण कसं असू शकतं, असा सवाल तिने केला. अनेक नावाजलेल्या सिनेमा करत ग्लॅमर इंडस्ट्रीत स्वतःची वेगळी एक ओळख निर्माण केली तरीही माझ्या नावासोबत सावळा हा शब्द कायमचा राहिला.
जिस्म , राज , अजनबी आणि धूम यांसारख्या चित्रपटांत मादक रूपात दिसलेल्या बिपाशाने अनेक हिट सिनेमे दिलेत. गोदरेज सिंथॉल सुपरमॉडेल स्पर्धा आपल्या नावी केल्यानंतर १९९६ पासून तिने आपल्या मॉडेलिंग करिअरला सुरुवात केली. २००१ मध्ये अजनबी या सिनेमाद्वारे बिपाशाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. २००२ मध्ये रिलीज झालेला राज हा बिपाशाच्या करिअरमधील पहिला हिट सिनेमा होता.