'शाब्बास मिथू'; मिताली राजची कथा रुपेरी पडद्यावर, तापसी पन्नू अभिनीत सिनेमा या दिवशी येणार भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2022 02:19 PM2022-04-29T14:19:12+5:302022-04-29T14:19:56+5:30

Shabaash Mithu: 'शाब्बास मिथू' या चित्रपटात तापसी पन्नू (Taapsi Pannu) भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजची भूमिका साकारत आहे.

'Shabbas Mithu'; The story of Mithali Raj will be screened on the silver screen | 'शाब्बास मिथू'; मिताली राजची कथा रुपेरी पडद्यावर, तापसी पन्नू अभिनीत सिनेमा या दिवशी येणार भेटीला

'शाब्बास मिथू'; मिताली राजची कथा रुपेरी पडद्यावर, तापसी पन्नू अभिनीत सिनेमा या दिवशी येणार भेटीला

googlenewsNext

बॉलिवूडमध्ये सध्या बायोपिकचा हंगाम सुरू आहे. विशेषत: क्रिकेटवर अनेक चित्रपट बनत आहेत. रणवीर सिंगच्या '८३' नंतर अनुष्का शर्मा 'चकदा एक्सप्रेस' घेऊन येत आहे. त्याचबरोबर तापसी पन्नू 'शाब्बास मिथू' (Shabaash Mithu)मध्येही दिसणार आहे. तापसी पन्नू(Taapasi Pannu)च्या या चित्रपटाची रिलीज डेट समोर आली आहे. शाब्बास मिथ्थू १५ जुलै २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे.

'शाब्बास मिथू'चे दिग्दर्शन सृजित मुखर्जी यांनी केले आहे. यापूर्वी हा चित्रपट गेल्या वर्षी ५ फेब्रुवारीला रिलीज होणार होता. त्यावेळी याचे दिग्दर्शन राहुल ढोलकिया करत होते. पण कोरोना महामारीमुळे 'शाब्बास मिथू'ची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली. जून २०२१ मध्ये, दिग्दर्शक सृजित मुखर्जी यांनी राहुल ढोलकियाची जागा घेतली. आता 'शाब्बास मिथू'ची नवीन रिलीज डेट १५ जुलै आहे. या चित्रपटात तापसी पन्नू भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजची भूमिका साकारत आहे.

तापसी पन्नूने 'शाब्बास मिथू'च्या नवीन पोस्टरसह चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. तापसीने लिहिले, 'स्वप्न आणि ते प्रत्यक्षात उतरवण्यासाठी प्लानिंग असलेल्या मुलीपेक्षा जास्त प्रभावशाली काहीही नाही. या 'जंटलमन्स गेम'मध्ये बॅटने आपल्या स्वप्नाचा पाठलाग करणाऱ्या मुलीची ही कथा आहे.
तापसी पन्नूने गेल्या वर्षी 'शाब्बास मिथू'चा फर्स्ट लूक रिलीज केला, ज्याला जबरदस्त प्रतिसाद मिळाला.


मिताली राजबद्दल सांगायचे तर, मितालीने वर्ष २००० मध्ये पहिला वर्ल्ड कप स्पर्धेत पदार्पण केले होते. तेव्हापासून तिने आतापर्यंत ३१ विश्वचषक सामने खेळली आहे आणि ११३९ धावा केल्या आहेत. महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत मिताली सध्या पाचव्या क्रमांकावर आहे.  
तापसी पन्नूने मिताली राजची मैत्रीण आणि माजी क्रिकेटपटू नूशीन अल खदीर यांच्याकडून 'शाब्बास मिथू'साठी प्रशिक्षण घेतले. अभिनेत्रीोच्या आगामी प्रोजेक्टबद्दल सांगायचे तर ती 'शाब्बस मिथू' व्यतिरिक्त 'जन गण मन', 'दोबारा', 'एलियन', 'ब्लर', 'वो लड़की है कहां?' आणि 'डंकी' या चित्रपटात झळकणार आहे.

Web Title: 'Shabbas Mithu'; The story of Mithali Raj will be screened on the silver screen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.