९०च्या दशकात दूरदर्शनसाठी अँकरिंग करत होता बॉलिवूडचा हा अभिनेता, जुना व्हिडिओ झाला व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2019 04:53 PM2019-10-04T16:53:32+5:302019-10-04T17:58:14+5:30

बॉलिवूडच्या या अभिनेत्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. जो नव्वदच्या दशकातील आहे.

Shah Rukh Khan Anchoring Doordarshan Old Video Viral | ९०च्या दशकात दूरदर्शनसाठी अँकरिंग करत होता बॉलिवूडचा हा अभिनेता, जुना व्हिडिओ झाला व्हायरल

९०च्या दशकात दूरदर्शनसाठी अँकरिंग करत होता बॉलिवूडचा हा अभिनेता, जुना व्हिडिओ झाला व्हायरल

googlenewsNext


'झिरो' चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर बॉलिवूडचा किंग खान शाहरूखने आतापर्यंत कोणताच सिनेमा साईन केलेला नाही. सध्या तो कुटुंबासोबत वेळ व्यतित करतो आहे. त्याचे चाहते त्याला रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक झाले आहेत. त्यात आता शाहरूखचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. 

खरेतर शाहरूख खानचे चाहते त्याला खूप मिस करत आहेत. शाहरूखचा एक व्हिडिओ समोर आला आहे जो नव्वदच्या दशकातील आहे. हा व्हिडिओ दूरदर्शनचा असून यात शाहरूख खान अँकरिंग करताना दिसतो आहे.




शाहरूख खानसोबत एक महिला अँकरदेखील आहे जी सांगते की आता कुमार शानू परफॉर्म करणार आहे. त्यानंतर शाहरूख विचारतो की, हे तेच कुमार शानू आहेत का जे किशोर कुमार यांच्या अंदाजात गाणे गातात?  शाहरूखच्या प्रश्नावर महिला अँकर म्हणाली की, त्यांचा आवाज किशोर यांच्यासारखा आहे. पण त्यांचा वेगळा अंदाज आहे. यानंतर शाहरूख खान कुमार शानूला स्टेजवर बोलवतो.

शाहरूखने करियरची सुरूवात १९८९ साली दूरदर्शनवर प्रसारित झालेली मालिका फौजीमधून केली होती.


शाहरूख खानच्या आगामी प्रोजेक्टबद्दल सांगायचं तर त्याने सांगितलं की, आता दोन-तीन स्क्रीप्टवर काम करत आहेत आणि जेव्हा तो कोणता चित्रपट फायनल करेल तेव्हा तो स्वतः घोषणा करणार आहे. 


शाहरूख खानची प्रोडक्शन हाऊस कंपनी रेड चिलीज एण्टरटेन्मेंटची वेबसीरिज 'बार्ड ऑफ ब्लड' नेटफ्लिक्सवर २७ सप्टेंबरला प्रदर्शित झाली आहे. यात अभिनेता इमरान हाश्मी मुख्य भूमिकेत आहे.

या सीरिजला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. 

Web Title: Shah Rukh Khan Anchoring Doordarshan Old Video Viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.