Jhoome Jo Pathaan Song : झुमे जो पठाण....! ‘बेशरम रंग’नंतर रिलीज झालं ‘पठाण’चं दुसरं गाणं, तुम्ही पाहिलंत का?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2022 12:09 PM2022-12-22T12:09:43+5:302022-12-22T12:10:38+5:30

Jhoome Jo Pathaan Song : ‘पठाण’चं दुसरं गाणं रिलीज झालं आहे. ‘झुमे जो पठाण’ असे या गाण्याचे बोल आहेत. रिलीज होताच या गाण्यानं सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

Shah Rukh Khan And Deepika Padukone Pathaan Song Jhoome Jo Pathaan out | Jhoome Jo Pathaan Song : झुमे जो पठाण....! ‘बेशरम रंग’नंतर रिलीज झालं ‘पठाण’चं दुसरं गाणं, तुम्ही पाहिलंत का?

Jhoome Jo Pathaan Song : झुमे जो पठाण....! ‘बेशरम रंग’नंतर रिलीज झालं ‘पठाण’चं दुसरं गाणं, तुम्ही पाहिलंत का?

googlenewsNext

Jhoome Jo Pathaan Song : शाहरूख खान ( Shah Rukh Khan ) व दीपिका पादुकोणच्या (Deepika Padukone) ‘पठाण’ (Pathaan) या सिनेमाचं पहिलं गाणं ‘बेशरम रंग’ रिलीज झालं आणि या गाण्यावरून कधी नव्हे इतका राडा झाला. ‘बेशरम रंग’मध्ये दीपिकाने घातलेली भगव्या रंगाची बिकिनी अनेकांना खटकली. हिंदू संघटना यावरून आक्रमक झाल्यात. अगदी ‘पठाण’वर बहिष्कार टाकण्याची मागणी पुढे रेटली गेली. हा वाद अजूनही सुरूच असताना आता ‘पठाण’चं दुसरं गाणं रिलीज झालं आहे. ‘झुमे जो पठाण’ असे या गाण्याचे बोल आहेत. या गाण्यानं रिलीज होताच सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

गाण्यात शाहरूख व दीपिकाचा किलर अवतार बघण्यासारखा आहे. दोघांचा डान्सही तितकाच किलर आहे. दीपिका नेहमीप्रमाणे बोल्ड लुकमध्ये दिसतेय. या गाण्यातील सगळ्यात खास बात म्हणजे, शाहरूखची आयकॉनिक डान्स पोझ यामध्ये बघायला मिळतेय. विशाल-शेखरने संगीतबद्ध केलेलं हे गाणं अरिजीत सिंग, सुकृति कुमारने गायलं आहे.

यश राज फिल्म्सच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंट आणि युट्यूब चॅनलवर प्रदर्शित झालं आहे. या गाण्यातही शाहरुख आणि दीपिका यांची हॉट केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. शाहरुख खानने नुकतंच त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून या नवीन गाण्याचा फर्स्ट लूक पोस्टर शेअर केला होता. हे गाणं हिंदी, तमिळ आणि तेलुगू अशा ३ भाषांमध्ये बघायला मिळणार आहे.

‘पठाण’ हा चित्रपट येत्या 25 जानेवारीला प्रदर्शित होत आहे. शाहरुख, दीपिकाबरोबरच जॉन अब्राहमही यात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सिद्धार्थ आनंद यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.

Web Title: Shah Rukh Khan And Deepika Padukone Pathaan Song Jhoome Jo Pathaan out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.