'या' कारणावरून शाहरूख खान आणि गौरीचं व्हायचं कडाक्याचं भांडण, किंग खाननेच दिली होती याची कबुली

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2021 03:11 PM2021-03-27T15:11:13+5:302021-03-27T15:49:11+5:30

दोघांच्याही कुटुंबाचा या लग्नाला प्रखर विरोध होता.

Shah Rukh Khan and gauri have a heated argument over this reason, | 'या' कारणावरून शाहरूख खान आणि गौरीचं व्हायचं कडाक्याचं भांडण, किंग खाननेच दिली होती याची कबुली

'या' कारणावरून शाहरूख खान आणि गौरीचं व्हायचं कडाक्याचं भांडण, किंग खाननेच दिली होती याची कबुली

googlenewsNext

शाहरुख खानला बॉलिवूडचा किंग म्हणून ओळखलं जाते. पडद्यावर शाहरूखच्या भूमिका जितक्या रोमॅन्टिक आहेत, अगदी तितकीच रोमॅन्टिक त्याची व गौरीची लव्हस्टोरीही आहे.


गौरी १४ वर्षांची आणि शाहरूख १९ वर्षांचा असताना त्यांची प्रथम नजरानजर झाली. शाहरूखने गौरीला पाहिले आणि पहिल्याच नजरेत तो तिच्या प्रेमात पडला. मग गौरी हीच जणू शाहरूखचा ध्यास बनली. त्याने गौरीसमोर स्वत:चे प्रेम व्यक्त केले. सुरुवातीला गौरी नकार देत राहिली. पण शाहरूखचे खरे प्रेम पाहून ती त्याच्यापासून फार काळ दूर राहू शकली नाही आणि मग सुरु झाली एक प्रेम कहाणी.


शाहरूख गौरीबद्दल अतिशय पजेसिव्ह होता. इतका की, तिने स्वीमसूट घातलेला वा केस मोकळे सोडलेले शाहरूखला चालायचे नाही. तो या मुद्यावरून तिच्यासोबत भांडायला उठायचा. खुद्द शाहरूखनेच एका ठिकाणी ही कबुली दिली होती. ती केस मोकळे सोडायची तेव्हा अप्रतिम दिसयाची. तिला अन्य कुणी पाहावे, हेच मला खपेना. माझ्या आत असुरक्षिततेची भावना होती. कारण आम्ही फार भेटू शकत नव्हतो. आमच्या भेटी-गाठी फार क्वचित होत. त्यामुळे तिच्याबद्दल मी खूप पजेसिव्ह झालो होतो.


शाहरूख व गौरीचे धर्म वेगवेगळे होते. त्यामुळे प्रेम लग्नात बदलण्यासाठी दोघांनाही बरेच तेल गाळावे लागले. दोघांच्याही कुटुंबाचा या लग्नाला प्रखर विरोध होता. पण अखेर दोघांच्याही प्रेमापुढे घरच्यांना झुकावेच लागले. २६ आॅगस्ट १९९१ रोजी शाहरूख व गौरी दोघांनी कोर्ट मॅरेज केले. यानंतर दोघांचा ‘निकाह’ झाला. यावेळी गौरीचे नाव बदलून आयशा ठेवण्यात आले. २५ आॅक्टोबर १९९१ रोजी दोघांचाही हिंदू परंपरेने विवाह झाला.

Web Title: Shah Rukh Khan and gauri have a heated argument over this reason,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.