​५०० कोटींच्या पोंजी घोटाळ्यात शाहरूख खान व नवाजुद्दीन सिद्दीकीचे नाव!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2017 06:58 AM2017-06-29T06:58:59+5:302017-06-29T12:28:59+5:30

अभिनेता शाहरूख खान आणि नवाजुद्दीन सिद्दीकी यांना एका कंपनीचा प्रचार करणे महागात पडण्याची चिन्हे आहेत. होय, सीबीआयने गाझियाबादस्थित वेबवर्क ...

Shah Rukh Khan and Nawazuddin Siddiqui named in the Rs 500 crore Ponzi scam! | ​५०० कोटींच्या पोंजी घोटाळ्यात शाहरूख खान व नवाजुद्दीन सिद्दीकीचे नाव!

​५०० कोटींच्या पोंजी घोटाळ्यात शाहरूख खान व नवाजुद्दीन सिद्दीकीचे नाव!

googlenewsNext
िनेता शाहरूख खान आणि नवाजुद्दीन सिद्दीकी यांना एका कंपनीचा प्रचार करणे महागात पडण्याची चिन्हे आहेत. होय, सीबीआयने गाझियाबादस्थित वेबवर्क ट्रेड लिंक्सने कथितरित्या केलेल्या ५०० कोटी रूपयांच्या आॅनलाईन घोटाळ्याची चौकशी सुरू केली आहे आणि याप्रकरणात शाहरूख आणि नवाज या दोघांची नावे आहेत. शाहरूख व नवाज या दोघांनी या कंपनीचे पोर्टल एड्सबुक डॉट कॉमचा प्रचार केला होता.
याप्रकरणी दाखल तक्रारी शाहरूख व नवाजुद्दीन यांचे नाव नमूद आहे. वेबवर्क ट्रेड लिंक्सचा प्रमोटर अनुराग जैन आणि संदेश वर्मा यांनी एड्सबुक डॉट कॉम नामक एक बनावट कंपनी बनवली. शाहरूख व नवाज या कंपनीचे ब्रॅण्ड अ‍ॅम्बिसीडर होते. या कंपनीने १० डिसेंबर २०१६ रोजी आपल्या ब्रॅण्ड अ‍ॅम्बिसीडरचा वापर करत लोकांची फसवणूक केली. दोन्ही सेलिब्रिटीच्या प्रभावाखाली येत, लोकांनी या कंपनीत बरीच मोठी गुंतवणूक केली, असे तक्रारीत म्हटले आहे. अर्थात या संपूर्ण प्रकरणाचा तपास करणाºया उत्तर प्रदेश पोलिसांनी शाहरूख व नवाज या दोघांना आरोपी वा संशयित ठरवलेले नाही. 

ALSO READ : ​ ‘रईस’चा ‘तो’ प्रमोशन इव्हेंट शाहरूख खानला भोवणार! गुन्हा दाखल होण्याची शक्यता!!

जैन व वर्मा यांनी आपल्या वेबसाईटवरील जाहिरातींवर प्रत्येक क्लिकमागे पैसे देण्याचे आमिष दाखवून लोकांना लुबाडले. क्लिक करून पैसे कमावण्याच्या या योजनेपोटी केवळ चार महिन्यांत चार लाख लोक या वेबसाईडशी जुळले. यानंतर वर्मा व जैन यांनी सुमारे २ लाख लोकांकडून जवळपास ५०० कोटी रूपयांवर पैसा गोळा केला. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर सीबीआयने या प्रकरणाचा तपास आपल्या हाती घेतला आहे.  

Web Title: Shah Rukh Khan and Nawazuddin Siddiqui named in the Rs 500 crore Ponzi scam!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.